नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या अतिशय देखण्या अशा ‘म्युझिकल फाउंटेन आणि लाईट अँड साऊंड शो’चे ‘ट्रायल शो’ उद्या रविवार पासून सुरू होत आहेत. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने २१ तारखेपर्यंत दररोज सायंकाळी ७ आणि रात्री ९ वाजता असे दोन ‘ट्रायल शो’ सादर केले आहेत.
हेही वाचा >>>नागपूर : तरुणांमध्येही मणके विकाराचे प्रमाण वाढले ; जागतिक स्पाईन दिवस आज
त्या-त्या दिवसाच्या प्रवेशिका कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, सिव्हिल लाइन्स येथून सकाळी ११ ते १ या वेळेत प्राप्त करता येतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ‘म्युझिकल फाउंटन शो’चा नागपूरकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी केले आहे.