बुलढाणा: मुस्लीम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज गुरुवारी बुलढाण्यात दिमाखादार जुलूस काढण्यात आला. गणेश विसर्जन, पोलिसांवर पडणारा ताण लक्षात घेऊन मुस्लीम बांधवांनी यंदा वेळेची मर्यादा बाळगून ‘जश्ने ईद मिलादुन्नबी’ साजरा केला.

हेही वाचा >>> वाशिम: म्हशीने सोन्याची पोथ खाल्ली अन् एकच धांदल उडाली, नंतर मात्र…

Consumer centric approach harming interests of farmers
निवडणुकीपुरते  शेतकऱ्यांना चुचकारण्याचे धोरण
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
maharashtra assembly election 2024 many agricultural work disrupted due to election campaigning
प्रचारामुळे शेतीकामे ठप्प! शेतमजुरी ३००; तर राजकीय पक्षांकडून जेवणासह ४०० रुपये
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !

अजिंठा मार्गावरील इंदिरा नगर येथून जुलूसला प्रारंभ झाला. घोड्यावर स्वार बालक, डीजेवरील धार्मिक गीते व कव्वालीचा निनाद, ध्वज फिरविणारे युवक, पारंपरिक वेशभूषेत सहभागी समाजबांधव असा जुलूसचा थाट होता. संगम चौक, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार,जनता चौक मार्गे हा जुलूस इकबाल चौक, टिपू सुलतान चौकात पोहचला. इकबाल चौकात समारोप करण्यात आला.

हेही वाचा >>> सणासुदीच्या काळात दोन विशेष रेल्वेला मुदतवाढ, उत्तर-पश्चिम भारतात जाण्यासाठी…

अनेक ठिकाणी उद्या जुलूस आज गणेश विसर्जन असल्याने कायदा व सुव्यस्थाचा प्रश्न लक्षात घेण्याचे सामंजस्य मुस्लीम बांधवांनी दाखविले.  बुलढाणा जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी जश्ने ईद मिलादुन्नबी उत्सवनिमित्त उद्या शुक्रवारी जुलूस काढण्यात येणार आहे. यातच उद्या सुट्टी जाहीर झाल्याने शुक्रवारचा ‘जश्न’ जोरदार राहील, अशी चिन्हे आहेत.