नागपूर : “चित्रपटाची ऑस्कर पुरस्कारासाठी निवड होणे म्हणजे तो चित्रपट सर्वश्रेष्ठ होत नाही. चित्रपट रसिकांनी केलेले कौतुक आमच्यासाठी ऑस्कर पुरस्कार आहे”, असे मत चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘घर, बंदूक, बिर्याणी’ या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमाशी बोलत होते. आतापर्यंत ज्या चित्रपटाची निर्मिती केली ते ऑस्करला पाठवले नाही. जागतिक पातळीवर चित्रपट तयार करू त्यावेळी ऑस्करसाठी पाठवण्याचा विचार करू. पण कुठल्याही चित्रपटाची निर्मिती करताना तो पुरस्कारासाठी नाही, तर चित्रपट रसिकांना वेगळे आणि चांगले काय देऊ शकतो याचा विचार करत निर्मिती केली जात असल्याचे मंजुळे यांनी सांगितले.

हेही वाचा – बुलढाणा: वासनांध पित्याचा स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता चार महिन्यांची गरोदर

हेही वाचा – चंद्रपूर: नगरोत्थान निधी वाटपावरून भाजपात घमासान, नगरसेवक नाराज

‘घर, बंदूक, बिर्याणी’ हा चित्रपट अन्य चित्रपटापेक्षा वेगळा आहे. पोलीस विभागात तेरा दिवस मी काम केले आहे, त्यामुळे पोलिसांचे जीवन जवळून बघितले आहे. माझ्या पोलीस मित्रांना बघून त्यांच्याकडून पोलिसांचे काम कसे असते शिकलो आणि त्यामुळे या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका केली आहे. चित्रपटात कामे केलीत, मात्र नाटकात काम करावे, असे कधी वाटले नाही. नाटकासाठी जो अभिनय लागतो त्या दृष्टीने तयारी नाही. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाही ही समस्या अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. जे चित्रपट चांगले आहे त्यांना अडचण नाही, मात्र मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाही ही समस्या आहे. यासाठी वर्तमानपत्रातून लिहिले पाहिजे, असेही नागराज मंजुळे म्हणाले.