आता रक्षणाची जबाबदारी मुलाच्या खांद्यावर

भारत आणि पाकव्याप्त काश्मीरला (पीओके) लागून असलेल्या आणि सामारिकदृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या कृष्णा घाटी सेक्टरमधील ‘नंगी टेकडी’ भारत-पाक युद्धात पाकिस्ताकडून हस्तगत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे मेजर शेरसिंग ग्रेवाल यांचा मुलगा कर्नल एच.एस. ग्रेवाल आज याच सेक्टरमध्ये भारतीय सीमा रक्षणाची जबाबादरी पार पाडत आहेत.

Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
pune officers without helmet no entry
पुणे: सावधान ! महापालिकेच्या इमारतीमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश कराल तर…!
Who is heir of Babasaheb ambedkar Gavai or Ambedkar
बाबासाहेबांचे वारसदार कोण? आंबेडकर की गवई?
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…

भारतीय लष्करासाठी नंगी टेकडीची लढाई मैलाचा दगड ठरली आहे. त्यामुळे भारतीय लष्कराच्या इतिहासाला सन्मान आणि गौरव प्राप्त झाला आहे. ही लढाई म्हणजे वीरता आणि धाडसाचे प्रतीक आहे. शत्रूने १८ पीओकेच्या दोन कंपन्यांच्या मदतीने या टेकडीवर कब्जा करून मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला होता. २१ पंजाबच्या तुकडीने यासाठी लढा दिला होता.

या टेकडीवर डाव्या बाजूने अल्फा आणि उजव्या बाजूने ब्रवो कंपनीने हल्लाबोल केला. अल्फा कंपनीचे नेतृत्व मेजर शेरसिंग ग्रेवाल, तर ब्रवो कंपनीचे नेतृत्व मेजर पी.एस. भाईन्स करत होते. भारताने या टेकडीवर ११ डिसेंबर १९७१ ला तिरंगा फडकवला. या लढय़ात शिपाई अवतारसिंग शहीद झाले. त्यांना मरणोत्तर वीरचक्र प्रदान करण्यात आले. मेजर शेरसिंग यांना सेनापदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. आज याच मेजर शेरसिंग ग्रेवाल यांचा मुलगा कमांडिग ऑफिसर कर्नल एच.एस. ग्रेवाल आता नियंत्रण रेषेवर सुरक्षेची जबाबदारी पार पाडत आहे.

ग्रेवाल कुटुंब आणि लष्कर यांचे तीन पिढय़ांचे नाते आहे. कर्नल एच.एस. ग्रेवाल यांच्या रुता या कुटुंबातील तिसरी पिढी देशाच्या सीमा रक्षणात आहे. ग्रेवाल यांचे आजोबा कॅप्टन इंदरसिंग दुसऱ्या महायुद्धात सहभागी झाले होते. त्यांचे थोरले बंधू कर्नल बलदेव सिंग हेही लष्करात होते.

कर्नल एच.एस. ग्रेवाल म्हणाले, वडील मेजर शेरसिंग ग्रेवाल यांनी जिंकलेली नंगी टेकडीला जेव्हा मी आपल्या पोस्टवरून बघतो तेव्हा अभिमान वाटतो. तेव्हा केवळ एका बटालियनने ही टेकडी ताब्यात घेतली. आता अशा प्रकारची टेकडीवर जिंकण्यासाठी दहापट सैन्य लागेल. नंगी टेकडी असलेल्या भागाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ही टेकडी वडिलांनी शूत्रकडून ताब्यात घेतली आणि तेथेच मला काम करण्याची संधी मिळाली आहे, असेही ते म्हणाले.

नंगी टेकडी काय आहे?

१० किलोमीटरचा परिसर असलेल्या या टेकडीवर एकही झाड नसल्याने तिला नंगी टेकडी असे म्हटले जात होते. पाकिस्तान या टेकडीला खाकी टेकडी म्हणत. कारण, या टेकडीवरी

ll securityल मातीचा तसाच रंग आहे. भारतासाठी सामरिकदृष्टय़ा ही टेकडी महत्त्वाची आहे. १९७१ पर्यंत ही टेकडी पाकिस्तानकडे होती. युद्धात भारताने ती ताब्यात घेतली. आज या टेकडीवर भारतीय लष्कराने मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. त्यामुळे संपूर्ण टेकडीवर हिरवे रान झाले आहे.