नागपूर : रस्त्यावर आयुष्य जगणाऱ्या भारतीय कुत्र्यांच्या आणि मांजरीच्या पिल्लांशी बरेचदा गैरवर्तन केले जाते. याविरोधात असलेल्या कायद्याबाबत जागरूकता नसल्यामुळे या मुक्या जीवांना वाहनांखाली चिरडून मारलेही जाते. त्यांच्या शेपटीला फटाके बांधले जातात आणि अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यांना त्यांच्या नेहमीच्या ठिकाणाहून उचलून दूर कुठेतरी नेऊन टाकले जाते आणि हे प्रकार रोज होत आहेत.
ही जनावरे मुकी असली तरीही त्यांना मानवाप्रमाणे संवैधानिक स्वातंत्र्य आणि कायदेशीर संरक्षण दिले जाते. त्यांचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे घटनात्मक कर्तव्य आहे. लहान कुत्रे आणि मांजरीचे पिल्लू त्यांना इतरत्र कुठेतरी सोडले तर ते जगणे अशक्य आहे त्यांना चांगलं कुटुंब, चांगलं घर, जीवन मिळावं आणि एकही कुत्रा बेघर राहू नये हे लक्षात घेऊन आवाजहीनांचे कल्याण या नावाने मोहीम सुरू करण्यात आली आहे. ‘आवाज’ संस्थेने रविवारी नागपूर मेडिकल चौकातील राजाबक्ष मंदिराच्या मैदानात श्वान आणि मांजरीचे पिल्लू पाळण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात प्राणीप्रेमींनी देशी कुत्र्यांच्या वैशिष्ट्यांची जाणीव करून दिली ज्याने मोठ्या संख्येने लोकांना या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी प्रेरित केले.
हेही वाचा – पवार गटाच्या आमदारांची अजितदादाशी भेट, मिटकरी म्हणाले “विरोधी बाकावर जीव रमत नसल्याने…”
u
नागरिकांनी आवाजहीन पिलांवर प्रेम केले आणि त्यांची आवडती पिल्ले आणि मांजरीचे पिल्लू दत्तक घेतले. या शिबिरात नागरिकांनी २५ देशी कुत्री आणि तीन मांजरीचे पिल्लू दत्तक घेतले व त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देऊन त्यांचे पालनपोषण करण्याचा संकल्प केला. प्राणी प्रेमी निकिता बोबडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्राणीप्रेमी प्रियंका कुमेरिया, सुरभी मेंढे, ओम जुमले, पूजा जैन, रफत खान, नेहा जैस्वाल, संपदा बोरेकर, सपेक्षी यांनी ‘लिलीज व्हॉईस’द्वारे मूक दत्तक घेण्याचा हा कार्यक्रम घडवून आणला. वेद आणि प्रणय गुप्ता यांचे विशेष योगदान होते.
हेही वाचा – भुजबळांचे मंत्रीपद अन् त्याचे नागपूर कनेक्शन
भारतीय कुत्रा का पाळावा?
भारतीय देशी कुत्रे भारतीय हवामानानुसार सर्व वातावरणाशी जुळवून घेतात. त्यांची रोग प्रतिकारशक्ती परदेशी कुत्र्यांपेक्षा जास्त असते. देशी कुत्र्यांच्या जाती भारताच्या पर्यावरण आणि संस्कृतीला अनुरूप विकसित झाल्या आहेत. हे कुत्रे सशक्त, स्वावलंबी असतात, घर, शेती, फार्म हाऊस यांच्या संरक्षणासाठी ठेवणे सोपे आणि कमी खर्चिक असते. कोणत्याही व्यक्तीला स्थानिक कुत्रे पाळायचे असतील तर त्यांनी ९९६०८९९९१९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.