नागपूर : नवीन सरकार स्थापन झाल्यावर काहींची मंत्रिपदे बदलली तर काहींना जुनीच खाती मिळाली. शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांच्याकडे पहिल्यांदाच शिक्षण खाते आले आहे. त्यांनी मंत्रीपद मिळतात भेटींचा धडाका लावला. यापूर्वी राज्याच्या विविध भागातील दौरा करत असताना त्यांनी अचानक शाळांना भेट दिल्याचे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. बुधवारी नागपूर दौऱ्यावर असताना दादा भुसे यांनी कळमेश्वर तालुक्यातील उबाळी गावातील शाळेला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी कशिश ठाकूर या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीने त्यांना कविता गाऊन दाखविली. या विद्यार्थिनीचे भूसे यांनी कौतूक केले. यावेळी भूसे यांनी शाळेची पाहणी केली. यावेळी शाळेमध्ये पुरवण्यात येणाऱ्या सुविधांची चौकशीही केली. यावेळी एका चिमुकलीने कविता म्हणून दाखवल्याने शिक्षण मंत्रीही या कवितेच्या प्रेमात पडले.

पालकमंत्री पदाचा आग्रह गैर नाही

नाशिक आणि रायगड येथील पालकमंत्रिपदाच्या वादावर ते म्हणाले, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याने पालकमंत्रिपद हवे आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे पद असल्याने प्रत्येकाला पालकमंत्रीपद आपल्याकडे हवे आहे. यात काही गैर नाही. आमची बांधिलकी जनतेशी आहे. कोणी मलाईसाठी आरोप करीत असले तर त्याला काही अर्थ नाही. पालकमंत्रिपदाबाबत शिवसेनेने दावा सोडणे किंवा करणे हा विषय नाही.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाशिक आणि रायगडाच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील. नाशिक आणि रायगड दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. रायगडमध्ये सर्वाधिक आमदार शिवसेनेचे असताना राष्ट्रवादीला पालकत्व देण्यात आले आहे. त्यावरून मोठा वाद सुरू आहे.

Story img Loader