नागपूर : केंद्र व राज्य शासन क्षयरोग जनजागृतीवर कोट्यावधींचा खर्च करते. त्यानंतरही शहरात १ जानेवारी २०२४ ते ५ डिसेंबर २०२४ दरम्यानच्या क्षयरोगाचे तब्बल ६ हजार ६६२ रुग्ण आढळले. परंतु या आजाराचा मृत्यूदर मात्र कमी करण्यात महापालिकेला यश आले. नागपूर शहरातील या आजाराच्या स्थितीबाबत आपण जाणून घेऊ या.

नागपुरातील शहरी भागात १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान क्षयरोगाचे ८ हजार २०० रुग्ण शोधण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ७ हजार ६१४ रुग्ण शोधण्यात यश मिळाले. २०२४ मध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाला ८ हजार ५० रुग्ण शोधण्याचे लक्ष्य दिले गेले होते. त्यापैकी ६ हजार ६६२ रुग्ण शोधण्यात यश आले. शहरात २०२२ मध्ये क्षयरोगामुळे ३९५ रुग्णांचा मृत्यू झाला. हे मृत्यू प्रमाण २०२३ मध्ये २४८ रुग्णांवर आले. यंदा ही संख्या स्पष्ट झाली नसली तरी त्याहून कमी असल्याचा महापालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा…गोंदिया: निर्दयीपणाघा कळस, श्वानाचे हातपाय, तोंड बांधून पोत्यात भरले, जंगलात फेकले

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये क्षयरोग मुक्त भारताची हाक देत विविध उपक्रम सुरू केले. त्यानुसार महापालिकेकडून रुग्णांना २०२३ पासून रेशन किट्स वाटण्यात येत आहे. या मोहिमेमुळे शहरात क्षयरोगाचे रुग्ण व मृत्यू कमी झालेले दिसत आहेत.” डॉ. शिल्पा जिचकार, शहर क्षयरोग अधिकारी, महापालिका.

शोध मोहिमेचा शुभारंभ आजपासून

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत महापालिकेच्या वतीने शहरामध्ये १०० दिवसीय क्षयरोग शोध मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ शनिवारी (७ डिसेंबर) सदर पोलीस स्टेशनजवळील जिल्हा नियोजन भवन येथून केला गेला. ही मोहीम देशभरातील निवडक ३४७ जिल्ह्यांमध्ये तसेच महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार असून त्यामध्ये नागपूर शहराची निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा…महायुती एक्टिव मोडवर! बाजार समिती बरखास्त करीत खासदार गटास दिला झटका.

या गोष्टींवर लक्ष….

७ डिसेंबर २०२४ पासून शहरातील क्षयरुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार सुरू करणे, क्षय रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे, नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे, क्षयरोग विषयी जनजागृती करणे, समाजामधील क्षयरोग विषयी जनजागृती करणे व सामाजिक कलंक कमी करण्यासाठी उपक्रम राबवणे, जिल्ह्यातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांना पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियानाअंतर्गत निक्षय मित्र यांच्याकडून पोषण आहार किटचे वाटप करणे आदी कार्य केली जाणार आहेत, अशी माहिती नागपूर महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.

Story img Loader