नागपूर : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर युवकाने बलात्कार केला. ती पाच महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर आईवडिलांनी चौकशीत प्रियकराचे नाव समोर आले. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी प्रियकराला अटक केली. अर्जून ऊर्फ निरंजन माहुरे (२३) रा. हिंगणा असे आरोपीचे नाव आहे.
पीडित मुलगी ही मूळची मध्यप्रदेशची असून ती आईवडिलांसह कामाच्या शोधात नागपुरात आली. ती आईवडिलांसह कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिरपूर खुर्सी येथील विटाभट्टीवर काम करीत होती. तेथेच आरोपी निरंजन माहुरे हा जेसीबी चालविण्याचे काम करीत होता. त्याने पीडित मुलीशी ओळख वाढवली आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
हेही वाचा – नागपूर : आमदार कृष्णा खोपडेंची आर्थिक फसवणूक, ठकबाजाने…
तिचे आईवडील कामावर गेल्यानंतर हा तिच्या घरी जाऊन तिच्याशी लगट करीत होता. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला डिसेंबर २०२३ मध्ये विटाभट्टीजवळील एका शेतात नेऊन तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती झाली.
हेही वाचा – विदर्भातील गावरान आंबा झालाय दुर्मिळ, लोणच्यासाठी भिस्त ‘या’ राज्यावर
आईवडिलांच्या सुरुवातीला ही बाब लक्षात आली नाही. प्रेयसी गर्भवती झाल्यामुळे निरंजनने काम सोडून पळ काढला. दुसरीकडे तिने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. त्यामुळे तिने तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी करून मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे आईने तिची कसून चौकशी केली असता तिने निरंजनचे नाव सांगितले. ती महिला मुलीला घेऊन नवीन कामठी पोलीस ठाण्यात पोहोचली. ठाणेदार पोरे आणि सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ यांनी या प्रकरणी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेऊन अटक केली.