महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील कोळसा हाताळणी विभागात स्टॅकर रिक्लेमर मशीनचा काउंटर वेट खाली आल्याने कॅबिनमधील दोन कामगारांचा दबून मृत्यू झाला.
संतोष मेश्राम तंत्रज्ञ (वय ३०) आणि मेसर्स एम.एफ.जैन कंत्राटदाराचा कंत्राटी कामगार प्रवीण शेंडे (वय ३५) वर्षे रा.कोराडी असे दगवलेल्या कामगारांची नाव आहेत.
ही घटना १८ ऑगस्ट रोजी पहाटे १.५० वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच वीज केंद्राचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. घटनेचे नेमके कारण? जबाबदार यांची चौकशी करण्यात येणार असून, प्रथमदर्शनी ज्या ठिकाणी हा अपघात घडला तेथील तीन अभियंत्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई सुरू आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांच्या परिवारास नुकसान भरपाई देणार असल्याचे मुख्य अभियंता राजू घुगे यांनी कळविले.