नागपूर : शहरातील चोरी प्रकरणातील एका आरोपीला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आणि जरीपटका पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. चोरीबाबत चौकशी सुरू असतानाच आरोपीने पोलिसांच्या टेबलाच्या ड्राव्हरमधील चाकू काढला आणि स्वत:च्या पोटात भोसकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. त्यामुळे तातडीने आरोपीला रुग्णालयात दाखल केले.

ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. प्रज्ज्वल शेंडे (२२, इंदोरा) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्ज्वल शेंडे हा कुख्यात चोर आहे. त्याच्यावर आतापर्यंत २८ गुन्हे दाखल आहेत. तो नेहमी पोलिसांच्या नाकावर टिच्चून घरफोड्या करायचा. त्याला यापूर्वी काही गुन्ह्यात अटक केली होती.

Two children in Nagpur infected with HMPV news
नागपुरात दोन मुलांना ‘एचएमपीव्ही’? गडचिरोलीत चार संशयित रुग्ण, नमुने तपासणीसाठी ‘एम्स’मध्ये
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
student physically assaulted, government hostel ,
बुलढाणा : शासकीय वसतिगृहेदेखील असुरक्षित! अधीक्षकाचा विद्यार्थ्यावर अत्याचार
imd predicted possibility unseasonal rains in maharashtra
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट! ; हवामान खाते…
minor girl sexualy abused by lover in nagpur
नागपूर : मध्यरात्री अल्पवयीन मुलगी प्रियकराच्या मिठीत; वडिलांनी…
man raped minor girl under railway bridge in nagpur
धक्कादायक! रेल्वे पुलाखाली अल्पवयीन मुलीवर करायचा लैंगिक अत्याचार…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
RTE, RTE Admission, RTE Admission Registration,
‘आरटीई’ प्रवेश नोंदणी १३ जानेवारीपासून, जाणून घ्या सविस्तर…

हेही वाचा – ‘आरटीई’ प्रवेश नोंदणी १३ जानेवारीपासून, जाणून घ्या सविस्तर…

सोमवारी रात्री प्रज्ज्वल हा जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करण्याच्या तयारीत होता. मात्र, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या पथकाच्या दृष्टीस पडला. पोलिसांना पाहून तो पळायला लागला. पोलिसांनी त्याला शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले व रात्रीच्या सुमारास जरीपटका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. जरीपटका पोलिसांनी त्याला रात्रभर पोलीस कोठडीत ठेवले.

मंगळवारी सकाळी ११.३० वाजता त्याला चौकशी करण्यासाठी कोठडीतून बाहेर काढले. तपास पथकाच्या खोलीत (डीबी) त्याला ठेवण्यात आले. चिडलेल्या प्रज्ज्वल एका कोपऱ्यात शांतपणे बसला. मात्र, डीबी पथकातील दोन्ही कर्मचारी खर्रा खाण्यात मग्न असतानाच बाजूला असलेल्या टेबलाच्या ड्राव्हरमधील चाकू घेतला आणि पँटच्या खिशात लपवला. काही वेळाने आणखी दोन पोलीस कर्मचारी तेथे आले. त्यांनी प्रज्ज्वलला घरफोडीतील मुद्देमालाविषयी विचारणा केली. काही वेळातच प्रज्ज्वलने चाकू काढला आणि स्वत:च्या पोटात भोसकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पोटातून रक्त वाहू लागताच पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष गेले. त्यांनी लगेच वरिष्ठांना माहिती दिली आणि प्रज्ज्वलला रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्यावर आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – बुलढाणा : शासकीय वसतिगृहेदेखील असुरक्षित! अधीक्षकाचा विद्यार्थ्यावर अत्याचार

जरीपटका पोलिसांना गांभीर्य नाही

एखादा कुख्यात आरोपी अटकेत असल्यानंतर पोलिसांनी गांभीर्य दाखवणे गरजेचे असते. मात्र, जरीपटका पोलीस आरोपींच्या बाबतीत अजिबात गंभीर नव्हते. जर त्या आरोपीने स्वत:ऐवजी पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला असता तर मोठा अनर्थ झाला असता. अटकेतील आरोपीच्या हातात चाकू लागू देणे ही सुद्धा गंभीर बाब असल्याची चर्चा आहे.

Story img Loader