वर्धा : जेईई मेन्सचा निकाल लागला. त्यात २४ विद्यार्थी १०० टक्के गुण घेत उत्तीर्ण झालेत. हे व एनआईटी प्रवेश मिळालेल्या गुणवंत विद्यार्थी यांना लगेच भक्ष्य केल्या जाते. अश्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशात आमचा मोलाचा वाटा, असा दावा सूरू होत असतो. महानगरात, प्रसिद्धी माध्यमात व अन्य प्रकारे त्याची भरभरून प्रसिद्धी केल्या जात असते. प्रामुख्याने खाजगी कोचिंग कलासेस त्यात आघाडीवर असतात. हा तर आमचाच क्लासचा विद्यार्थी, असे घोषित केल्या जाते. मात्र यात कितीतरी दावे खोटे व दिशाभूल करणारे असतात, हे दिसून आले आहे.
असा खोटा प्रचार करणारे वाढत चालले असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याची दखल एका सर्वोच्च संस्थेने घेतली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण म्हणजेच सेंट्रल कंझ्यूमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी या अनुषंगाने ईशारा दिला आहे. या प्राधिकरणाने अश्या क्लासेसना खबरदार करीत ईशारा दिला. या संस्थेने स्पष्ट केले की दिशाभूल करणाऱ्या जाहिराती व अयोग्य व्यापार पद्धत थांबवा, असे निर्देश आहेत. ग्राहक हक्काचे संरक्षण हा प्राधिकरण करतो. त्यानेच २०२४ साली कोंचिंग क्लास संबंधित विविध मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. पण त्याचे पालन होत नसल्याचे निरीक्षण आहे. म्हणून या मार्गदर्शक तत्वचे अचूक पालन करण्याचे नव्याने निर्देश देण्यात आले आहे.
मार्गदर्शक निकष पालन धुडकावून लावण्यात आले होते. पण ते पाळल्या गेले नाही म्हणून प्राधिकरणाने २४ कोचिंग सेंटरवर कारवाई केली. त्यांना ७७ लाख ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच देशातील ४९ क्लासेना नोटीस बजावण्यात आली होती.
प्राधिकरणाने स्पष्ट केले की कोचिंग क्लासने त्यांच्या जाहिराती अचूक, स्पष्ट व दिशाभूल करणारे दावे असल्याच्या असू नये. तशी खात्री पटवून द्यावी. गुणवंत विद्यार्थ्यांचे श्रेय घेतांना प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिरातीत विद्यार्थी नाव, अभ्यासक्रम वर्ग, भरलेली रक्कम आदी स्वरूपातील माहिती पारदर्शक ठेवावी. पण तरीही खोटे दावे होत असतात. त्यांना प्राधिकरणाने बजावले आहे. जो दावा करण्यात आला त्यात त्रुटी दिसून आल्यास त्या कोचिंग क्लासवार कडक कारवाई होईल, असा ग्राहक प्राधिकरण ईशारा देते. यात गैरप्रकार होवू नये म्हणून पुन्हा ही तंबी देण्यात आली असल्याचे स्पष्ट होते.