लोकसत्ता टीम

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गुरुवारला नागपूर कराराची होळी करत राज्य व केंद्र सरकारचा निषेध केला. व्हरायटी चौकातील गांधीपुतळा समोर समितीचे अध्यक्ष अरुण केदा यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी नागपूर कराराची होळी करण्यात आली.

Demand money from company owner in name of MLA Pune news
आमदाराच्या नावाने कंपनी मालकाकडे पैशांची मागणी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
कसब्यात एक ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रविंद्र धंगेकर यांना टोला
vip political leaders checking during the election campaign
बॅग तपासणीवरून नवे वादंग; नाहक त्रास देण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीचा आरोप, विरोधकांकडून केवळ राजकारण : महायुतीचे प्रत्युत्तर
congress rajya sabha mp abhishek manu singhvi at loksatta loksamvad event
आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सारे राजकीय पक्ष
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त

आणखी वाचा-भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भंडाऱ्यातील पत्रकारांकडून ढाब्यावर जेवणाचे निमंत्रण

२८सप्टेंबर १९५३ ला झालेल्या नागपूर कराराप्रमाणे विदर्भाला बळजबरीने विदर्भाच्या जनतेची इच्छा नसताना महाराष्ट्रात सामील करून घेतले, नागपूर करारात दिलेल्या ११ कलमांपैकी बहुतांश कलमा पाळल्या गेल्या नाही म्हणून नागपूर करार हा संपुष्टात आला असून विदर्भातील जनतेचा बॅकलॉग वाढला आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणून ४७ हजार शेतकऱ्यांची आत्महत्या झाली. बेरोजगारांची फौज वाढली, नक्सलवाद वाढला, कुपोषण वाढले आहे यापासून मुक्ती करता स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती केंद्र सरकारने तात्काळ करावी अशी मागणी करत नागपूर कराराच्या प्रतीची होळी करण्यात आली. विदर्भ राज्य झाले पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. प्रभाकर कोडबंतुवर, मुकेश मासुरकर, अहमद पटेल आदी विदर्भवादी नेते उपस्थित होते.