महेश बोकडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: उपराजधानीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) यावर्षीपासून ‘न्यूरो सर्जरी, नेफ्रोलॉजी, नवजातशास्त्र, बालरोग शल्यक्रिया या चार विषयाचे नवीन विशेषोपचार दर्जाचे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होत आहेत. त्यापैकी तीन नवीन अभ्यासक्रम सुरू होणारे एम्स हे पहिले शासकीय महाविद्यालय असणार आहे.

मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असलेल्या नागपुरातील मेडिकलमध्ये सर्वाधिक पदव्युत्तरचे अभ्यासक्रम व पदव्युत्तरच्या जागा आहेत. येथे अद्यापही नवजातशास्त्रचा अभ्यासक्रम नाही. मेडिकलशी संलग्नित सुपरस्पेशालिटी रुग्णालयातही अद्याप शासनाला न्यूरो सर्जरी, नेफ्रोलॉजीसह इतरही विशेषोपचार दर्जाचे (पदव्युत्तर) अभ्यासक्रम सुरू करता आले नाही.

आणखी वाचा- पोंभूर्णा, भद्रावती व गोंडपीपरीत प्रस्थापितांना धक्का; मुनगंटीवार, धानोरकर व धोटे गटांचा पराभव

अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया येथेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत. परंतु येथेही निवडक पदव्युत्तर अभ्यासक्रम सोडले तर इतर नवीन काही नाही. या शासकीय संस्थेत वैद्यकीय शिक्षण खाते विशेषोपचार दर्जाचे अभ्यासक्रम नसतानाच नागपुरात मात्र नंतर सुरू झालेल्या व केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या एम्समध्ये न्यूरो सर्जरी, बालरोग शल्यक्रिया, नेफ्रोलॉजी, नवजातशास्त्र या विषयाचे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होत आहेत. त्यापैकी बालरोग शल्यक्रिया विभाग सोडून इतर तीन अभ्यासक्रम शासनाच्या मध्य भारतातील एकाही शासकीय महाविद्यालयात नाही. त्यामुळे एम्स हे अभ्यासक्रम सुरू करणारी पहिली शासकीय संस्था ठरणार आहे. बालरोग शल्यक्रिया विभागाचा अभ्यासक्रम मात्र नागपुरातील मेडिकल, मेयो या दोन्ही संस्थेत आहे. या वृत्ताला एम्सच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

पाच वर्षांत पदव्युत्तरच्या जागांमध्ये १८ पटींनी वाढ

‘एम्स’ नागपूरला जुलै २०२० मध्ये पदव्युत्तरच्या ४ जागा सुरू झाल्या. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये १२ जागा, जानेवारी २०२२ मध्ये त्यात २८ जागा, जुलै २०२२ मध्ये ६ जागा, जानेवारी २०२३ मध्ये त्यात २५ जागांची भर पडली. आता येथे पदव्युत्तरच्या ७५ जागा झाल्या आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur aiims four new post graduate courses in specialty mnb 82 mrj
Show comments