नागपूर : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर तरुणीवर अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना पश्चिम नागपुरातील राजाराम सोसायटीतील उद्यानात असामाजिक तत्वांचा वावर वाढल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असून येथे तातडीने सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. पश्चिम नागपुरातील रोझ कॉलनी राजाराम सोसायटीतील उद्यानाची पुरती दैनावस्था झाली आहे़ अस्वच्छता, हायमास्ट निकामी आणि असामाजिक तत्वांचा वावर यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.

या परिसरातील वसहतीमधील उद्यान अतिशय वाईट स्थितीत आहेत. महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास कोणीही याकडे लक्ष देण्यास तयार नाही. येथे सायंकाळी असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे़ प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने हे उद्यान असामाजिक तत्त्वांचा अड्डा झाले आहे़ उद्यानातील पाळणे तुटले आहेत, घसरगुुंडीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे़ उद्यानात सर्वत्र गवत व कचरा वाढला आहे़ वॉकिंग ट्रॅकसाठी येथे दगड मागवण्यात आले होते, मात्र नंतर ते दुसऱ्या उद्यानात नेले़ त्यामुळ वॉकिंग ट्रॅकचीही दुरवस्था झाली आहे़ खेळण्याच्या लोखंडी वस्तू देखभालीअभावी गंजल्या आहेत़ तसेच ग्रीन जीमचे साहित्य देखील खराब झाले आहेत़ उद्यानाच्या मुख्य द्वारावर कुलूप नसल्याने व विजेच्या खांबावर दिवा नसल्याने सायंकाळनंतर येथे अंधार असतो़ राजाराम सोसायटीच्या या उद्यानाकडे महापालिका व नासुप्र प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जमाअत ए इस्लामी हिंद डॉ़ एम.ए. रशीद यांनी केली आहे़.

पूर्वी या उद्यानाला काटेरी कुंपण होते. आमदार विकास ठाकरे यांनी सुरक्षा भिंत उभारून दिली. आता उद्यानातील खेळणी तुटली आहेत, अस्वच्छता आहे. उद्यानात नव्याने काम करण्याची आवश्यकता आहे. इरफान खान, अध्यक्ष, राजाराम सोसायटी.

ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी नव्याने ट्रॅक बांधण्यात यावे. तसेच उद्यानात प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात यावे. येथे असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला असून स्थानिक नागरिकांना त्रास होत आहे. डॉ. एम.ए. रशीद.

Story img Loader