नागपूर: ग्राहकाचे वीज देयक थकल्यास महावितरणचे कंत्राटी कर्मचारी वसुलीसाठी जातात. सक्करदरा परिसरात कर्मचारी थकबाकीच्या वसुलीसाठी गेला असता तेथे वेगळा प्रकार घडला. हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत गेले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महावितरणच्या माहितीनुसार, वीज देयकापोटी असलेली थकबाकी वसुल करण्यास गेलेल्या महावितरणच्या अमोल शेळके या कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ केली. या प्रकरणात सक्करदरा पोलिसांकडून ईश्वर धिरडे या ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महावितरणच्या जनसंपर्क विभागाच्या माहितीनुसार, अमोल शेळके हा २५ नोव्हेंबरला सक्करदरा लेक गार्डन जवळील ईश्वर धिरडे या वीज ग्राहकाच्या घरी वीजदेयकाची वसुली करण्यास गेला होता. कर्मचाऱ्याने आवाज देऊनही संबंधित ग्राहकाने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अमोल शेळके यांनी ग्राहकाकडील विज पुरवठा नियमानुसार खंडित करण्यासाठी मीटरचे टर्मिनल बॉक्स उघडले. यावेळी ईश्वर धिरडे यांनी वीजपुरवठा खंडित करण्यास मज्जाव करताना अमोल यास शिवीगाळ करीत मारहाण केली. त्याचा भ्रमनध्वनी आपटून फोडला, सदर प्रकरणी अमोल शेळके याच्या तक्रारीच्या अनुषंगाने ईश्वर धिरडे या ग्राहकाविरोधात सक्करदरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११५ (२), ३५२ व ३२४ अन्वये दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सक्करदरा पोलीस चौकशी करीत आहेत.
हेही वाचा – VIDEO : जेव्हा जगातील सर्वाधिक उंच आणि कमी उंचीची महिला भेटतात…
राज्यात ३८ लाख ग्राहकांकडे देयक थकीत
राज्यातील ३८ लाख ग्राहकांकडून महावितरणला मूळ देयकाची ५०४८ कोटी, तसेच १७१९ कोटी रुपये व्याज आणि ६९ कोटी ९० लाख रुपये विलंब आकार थकीत आहे. कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित असलेल्या मराठवाड्यातील ग्राहकांकडे सर्वाधिक थकीत रक्कम आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण १०५४.६५ कोटी रुपये थकले आहेत. विदर्भात सर्वाधिक थकबाकी नागपूर शहर मंडळात २०३.३१ कोटींची आहे. अकोला ७१.९३ कोटी, बुलढाणा ९४.३३, वाशीम ५८.९७, अमरावती ६७.८०, यवतमाळ ८९.१७, चंद्रपूर २६.८२, गडचिरोली २२.३१, भंडारा १२१.२४, गोंदिया १४.७४, नागपूर ग्रामीण ४५.८३, वर्धा १८.९३ कोटी असे एकूण विदर्भातील सहा लाख २९ हजार ९४९ ग्राहकांकडे ८३५.३८ कोटी रुपये थकीत आहेत.
हेही वाचा – अपघातानंतर काढला ट्रॅव्हल्सचा परवाना; जखमींना सोडून ट्रॅव्हल्स मालक…
नियम काय?
ग्राहकाचे वीज देयक थकले असल्यास महावितरण कर्मचारी आधी संबंधिताला ते भरण्याबाबत सूचना देतात. देयक न भरल्यास संबंधिताला नोटीस दिली जाते. त्यानंतरही देयक न भरल्यास ग्राहकाकडे जाऊन प्रथम ते भरण्याबाबत सूचना करून ते न भरल्यास संबंधिताचा वीज पुरवठा खंडित केला जातो. त्यानंतर ग्राहकाने थकबाकीची रक्कम भरून संबंधित पावती महावितरणच्या कार्यालयात दाखवल्यावर पून्हा वीज पुरवठा पूर्ववत केला जातो.