माकडांना पुराच्या पाण्यातून सोडवण्यासाठी वनखात्याने स्वयंसेवींच्या मदतीने उभारलेल्या ‘हरितसेतू’ पार करून गुरुवारी सातपैकी सहा माकडांनी नैसर्गिक अधिवास गाठला.

नागपूरपासून १५-२० किलोमीटर अंतरावरील गोरेवाडालगतच्या माहूरझरी गावालगत असलेल्या तलावात गेल्या काही दिवसांपासून अतिउच्चदाब विजेच्या मनोऱ्यावर गेल्या काही दिवसांपासून सात माकडे फसली होती. तीन दिवसांपूर्वी वनविभागाने त्यांना सोडवण्यासाठी मोहीम सुरू केली होती. या मनोऱ्याच्या सभोवताल पाणी असल्याने मोहिमेत अडचणी येत होत्या.

नागपूर : पुराच्या पाण्यातून माकडांना वाचवण्यासाठी ‘हरितसेतू’ची निर्मिती

राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते यांनी त्यासाठी एक आराखडा तयार केला आणि त्यातून “हरितसेतू” उभारला गेला. ड्रमच्या साहाय्याने तराफे तयार करून व एकमेकांना जोडून जाळीच्या साहाय्याने सेतू एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत बांधण्यात आला. त्यावर हिरवळ पसरवून फळे टाकण्यात आली आणि चोवीस तासांच्या आत माकडांनी हा सेतू ओलांडला.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सारिका आदमने, पशुवैद्यकीय अधिकारी सुबोध नंदागवळी, अग्निशमन अधिकारी जगदीश बैस, माहुरझरी सरपंच संजय कुटे होते. या ठिकाणी आता एकच माकड अडकलेले असून ते देखील सुखरूप बाहेर पडेल अशी अपेक्षा या चमूने व्यक्त केली.

Story img Loader