नागपूर पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभे विरोधात मैदान बचाव कृती समिती न्यालयात जाणार आहे, असे भाजपचे माजी नगरसेवक हरिश दिकोंडवार यांनी सांगतले.सद्भभावना नगर दर्शन कॉलनी मैदान हे खेळाचे मैदान असून आजूबाजूला लोकवस्ती आहे.
त्यामुळे या मैदानात राजकीय सभा घेऊ नये म्हणून मैदान बचाव समिती गेल्या दोन दिवसापासून आंदोलन करीत आहे.दरम्यान भाजपचे माजी नगरसेवक हरीश दिकोंडवार यांनी सांगितले की, बचाव समिती न्यायलयात जाणार आहे.दरम्यान मंगळवारी झालेल्या आंदोलनात भाजप आमदार कृष्णा खोपडे उपस्थित होते.