नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या स्वायत्त संस्थेमार्फत २०२४-२५ या वर्षाकरिता विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना http://www.barti.in यासंकेतस्थळावरुन दिलेल्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे ३ जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार असून, विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संधीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्यसेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा व न्यायिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण तसेच बँकिंग, रेल्वे. एलआयसी आदींचे परीक्षा पूर्व प्रशिक्षण व पोलीस, मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण या विविध स्पर्धा परीक्षांचे नामांकित व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या पुतळ्याला काळे फासले…. बावनकुळेंच्या वाहनावर जोडा…..

स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीकरीता महाराष्ट्र शासनामार्फत सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या ३० ऑक्टोबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले. त्यानुसार ‘बार्टी’मार्फत विविध स्पर्धा परीक्षांचे खाजगी प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधी दरम्यान दरमहा अनुक्रमे १३ हजार रुपये विद्यावेतन व एकरकमी आकस्मित निधी देण्यात येईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्यसेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा व न्यायिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी व पोलीस, मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधी दरम्यान दरमहा अनुक्रमे १० हजार रुपये विद्यावेतन व एकरकमी आकस्मित निधी देण्यात येणार आहे.

हेही वाचा : नागपूर : वेळापत्रकात बदल करताच मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ

आधारसाठी अर्जाची शेवटची संधी

अनुसुचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येते. या योजनेच्या सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील उपस्थिती अहवाल सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या शैक्षणिक सत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचे अर्ज केलेल्या व पहिला हप्ता अदा झालेल्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळण्यासाठी उपस्थिती अहवाल सादर करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सत्रामधील उपस्थिती अहवाल सादर केलेले नाही अशा विद्यार्थ्यांना २८ जूनपर्यंत अंतिम संधी देण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur barti free coaching for upsc mpsc with 13 thousand rupees monthly stipend dag 87 css