नागपूर : वाघधरा येथे तीन मित्रांची निर्घृण हत्या करणारा आरोपी राजू बिरहा याला नागपूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फाशीची शिक्षा रद्द करत तीस वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राजू बिरहा याने पानटपरीच्या जागेवरून तीन मित्रांचा सत्तुरने खून केला होता. सत्र न्यायालयाने बिरहा याला डिसेंबर २०२२ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मंडळ अधिकारी व पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपींना १० वर्षांची शिक्षा

फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च न्यायालयाने शिक्षेवर शिक्कामोर्तब करणे आवश्यक आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाच्या वतीने उच्च न्यायालयात हे प्रकरण सादर करण्यात आले आहे. जुलै महिन्यात न्या. विनय जोशी आणि न्या. वाल्मीकी मेनेझेस यांच्या समक्ष प्रकरणावर सुनावणी झाली आणि न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. मंगळवारी यावर उच्च न्यायालयाने निर्णय दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur bench of bombay high court quashed death sentence of accused raju birha in triple murder case tpd 96 zws
Show comments