नागपूर : नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. ही गाडी १४ मे २०२३ पासून बंद करण्यात आली होती. त्या ऐवजी तेजस एक्स्प्रेस सोडण्यात येत होती. आता पुन्हा वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहे. पण ही १६ डब्यांची नव्हे, तर ८ डब्यांची असणार आहे.

नागपूर-बिलासपूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस सिकंदराबाद-तिरुपती दरम्यान वापरण्यात येत आहे. तर तेथे धावणारी ८ डब्यांची गाडी नागपूरला देण्यात आली आहे. बिलासपूर-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस गाडी क्रमांक २०८२५/२०८२६ चे नियमित आज, बुधवारपासून धावणार आहे.

हेही वाचा – वर्धा : ‘निधी वळता करा अन्यथा राजीनामा देतो’, भाजपा आमदार दादाराव केचे यांचे पालकमंत्री फडणवीस यांना खरमरीत पत्र

या वंदे भारत नवीन रेकमध्ये एक एक्झिक्युटिव्ह कोच आणि सात चेअर कार कोच राहतील. नागपूर – बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने हा बदल करण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाकडून तसे आदेश आले होते, असे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले.

Story img Loader