नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान शांततेत पार पडले. मात्र मतदार यादीतील घोळ सध्या चर्चेत आहे. यादीतून परस्पर नावे वगळल्याने अनेक जण मतदानापासून वंचित राहिले. याचा फटका भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रवीण दटके यांच्या कुटुंबियांना बसला.

नागपूर लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी ५४ टक्के मतदान झाले. मतदानाची टक्केवारी ७५ टक्के व्हावी म्हणून प्रशासनाने प्रयत्न केले होते. त्यानंतरही मतदान कमी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मतदार यादी अचूक व्हावी म्हणून प्रशासनाने मृत, स्थलांतरित मतदारांची नावे यादीतून गाळली, पण त्यासोबत हयात असणारे व नियमित मतदान करणाऱ्या मतदारांचीही नावे वगळण्यात आली. याचा मोठा फटका सर्व सामान्य मतदारांबरोबरच नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार प्रवीण दटके यांच्या कुटुंबियांना बसला. त्यांच्या भगिनी मतदानापासून वंचित राहिल्या.

Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nitin Raut Car Accident nagpur Maharashtra Assembly Election 2024
काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला अपघात
former ministers who rebel and won
अनेक माजी मंत्री, आमदारांचा बंडखोरी करून विजयाचा इतिहास, देशमुख, केदार, बंग, जयस्वाल आदींचा समावेश
Special facilities to transport disabled voters to the polling station
नागपूरकरांनो, दिव्यांग मतदारांना ‘ही’ मोफत सेवा…
Shekhar Shende filed complaint against Dr Pankaj Bhoyer for giving sarees and utensils to women
सरकारी सेवेतील लाडक्या बहिणींना साडी-भांडी; तक्रार होताच आमदार म्हणतात…
Yogi Adityanath, Yogi Adityanath comment on Mallikarjun Kharge, Mallikarjun Kharge,
‘बटेंगे तो कटेंगे यासाठी म्हणतो’, मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांची स्पष्टोक्ती, ‘रझाकारांच्या अत्‍याचारांवर..’

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी पराभवाच्या भीतीने बावचळले, खासदार संजय सिंह यांचा आरोप

हेही वाचा – अपक्षांमुळे होणाऱ्या मतविभाजनावर विजयाचा कौल? अंतिम टप्प्यात समाज माध्यमांवर प्रचारयुद्ध

दटके कुटुंबियांचे मतदान मध्य नागपुरातील दक्षिणमूर्ती चौकातील एका शाळेत होते. दटके यांच्या मोठ्या भगिनी प्रणिती दटके मतदानासाठी केंद्रावर गेल्या. मात्र त्यांचे नाव मतदार यादीत नव्हते. त्यांनी चौकशी केली असता वगळलेल्या मतदारांच्या यादीत त्यांचे नाव होते. विशेष म्हणजे त्यांचे नावही चुकवले. पतीऐवजी वडिलांचे नाव टाकण्यात आले. हजारो नावे अशाच प्रकारे चुकवण्यात आली. मतदार यादी दुरुस्तीचे व नवीन नावे समाविष्ट करण्याचे काम निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वीपासून केले जाते. तरीही अनेक चुका यादीत कायम आहेत.