नागपूर : राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असून मुख्यमंत्री कोण होणार याबाबत जनतेमध्ये उत्सुकता आहे. नागपूरच्या भाजप कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा आहे. त्यासाठी पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी ‘आमचे देवा भाऊ मुख्यमंत्री व्हावे’ यासाठी टेकडी गणपतीला साकडे घातले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवल्यानंतर राज्यात महायुतीला भरघोस असे यश मिळाले. महायुतीत भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ ठरला आहे. भाजपने एकहाती १३२ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे महायुतीसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी करत त्यांच्या समर्थकांकडून सोमवारी ठाण्यात मंदिरात आरती करण्यात आली. मंगळवारी नागपुरात भारतीय जनता पक्षाकडून फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मंदिरात पूजा अर्चा आणि आरती करुन साकड घातले. जनतेच्या हृदयस्थानी ते महाराष्ट्राच्या राजसिंहासनावर पुनर्प्रतिष्ठित, मुख्यमंत्री व्हावे अशी कामना करत महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष प्रगती पाटील यांच्या नेतृत्वात महिला पदाधिकाऱ्यांनी टेकडी गणपती मंदिर येथे महाआरती केली.

हेही वाचा : बिच्चारे कराळे गुरुजी! मार खाल्ला, मतंही गेली; आता कारवाई…

आमच्या लाडक्या भावालाच ( देवेंद्र फडणवीस) मुख्यमंत्री करा ,अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी प्रगती पाटील म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे आधुनिक अभिमन्यू आहेत . महाराष्ट्रभर महायुतीचा त्यांनी प्रचार केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेनी ठरवल आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावे यासाठी आम्ही टेकडी गणपतीला साकडे घातले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होईल असा विश्वास महिला आघाडीने व्यक्त केला. यावेळी चेतना टांक , प्रीती राजदेरकर, निकिता पराये, माजी नगरसेविका, मीनाक्षी तेलगोटे वर्षा ठाकरे, डॉ. माधुरी इंदुरकर,शालिनी बुल्ले,मंजुषा भुरे, प्रतिभा वैरागडे,रुपल दोडके,संध्या चतुर्वेदी ,डॉ कामला मोहता, वर्ष चौधरी , नीरजा पाटील,वर्षा भड, लता अवधाने, योगिता झरारिया आदी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

हेही वाचा : “रेल्वेत गेल्या दहा वर्षांत ५ लाख जणांना नोकऱ्या”, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा दावा

दक्षिण- पश्चिम आणि पूर्व नागपुरात महिला आघाडीच्यावतीने देवा भाऊ मुख्यमंत्री व्हावे यासाठी आरती करण्यात आली. दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शहरातील विविध भागात आमचे देवाभाऊ महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असे मोठमोठे फलक ठिकठिकाणी लावले आहे. महालातील कल्याणेश्वर मंदिरात युवा मोर्चाच्यावतीने महादेवाला साकडे घालण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur bjp woman workers pray tekdi ganpati for devendra fadnavis next chief minister of maharashtra vmb 67 css