नागपूर : पत्नीचे एका युवकाशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पतीला मिळाल्यानंतर पत्नीशी वाद करून तिच्या डोक्यात सळाखीने वार करून खून केला. ही घटना कपीलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीक्षितनगरातील पंचमवैद्य आर्य सोसायटीत घडली. मन्नत ऊर्फ मीनू दिलप्रीत विर्क (२४) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून आरोपी पती दिलप्रीत ऊर्फ विक्की कुलविंदरसींह विर्क (३०) याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलप्रीत याचे कपिलनगर चौकात किंग्स अॅसेसरीज नावाने कार डेकोरेशन आणि वाहनांच्या सुट्या भागाची विक्री करण्याचे दुकान आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी मन्नत आणि दिलप्रीतचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर त्यांनी कुटुंबियांना सांगून लग्न करून देण्याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनी नकार दिल्यानंतर कुटुंबियांच्या विरोधात जाऊन दोघांनी प्रेमविवाह केला. गेली चार वर्षे सुरळीत संसार सुरु होता. त्यांना दोन वर्षांचा मुलगा झाला. गेल्या काही दिवसांपूर्वी मन्नतचे एका गुन्हेगार प्रवृत्तीच्या युवकासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. काही महिने प्रेमसंबंध सुरु होते. गेल्या काही दिवसांपूर्वी सदर परीसरात पत्नी मन्नत त्या युवकासोबत दिसली. त्यामुळे चिडलेल्या दिलप्रीतने घरी जाऊन पत्नीशी वाद घातला. त्यानंतर त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाची भेट घेऊन प्रेमसंबंध तोडण्याची तंबी दिली. काही दिवसांनंतर दोघांच्या पुन्हा भेटी व्हायला लागल्या. त्यामुळे चिडलेल्या दिलप्रीतने मन्नतच्या कुटुंबियांशी चर्चा करून पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती देऊन घटस्फोट घेण्याचा निर्णय कळविला.
हेही वाचा – नागपुरातील’ हिट अँड रन ‘ प्रकरणात आरोपी महिलेचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने नाकारला…
अशी घडली घटना
मन्नतच्या अनैतिक संबंधावरून पती-पत्नीत वाद झाला. पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून दिलप्रीतने घरात तिच्या डोक्यावर सळाखीने वार करून ठार केले. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडून असताना त्याने घराला कुलूप लावले आणि निघून गेला. मन्नतची मैत्रिण आणि भाऊ विशालने मन्नतला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ती प्रतिसाद देत नव्हती. भावाला संशय आल्याने तो तिच्या घरी गेला. त्याने घराचे दार तोडले असता बहिणीचा मृतदेह दिसला. या प्रकरणी कपीलनगर पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून आरोपी दिलप्रीतला अटक केली. विशाल हा बहीण मन्नतला घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आला होता. कोटुंबिक वाद असल्यामुळे दिलप्रीतला आणि कुटुंबियांना बोलावून गुन्हा दाखल न करता समेट केल्याची प्रतिक्रिया ठाणेदार अजय आकरे यांनी दिली.
पोलिसांच्या हलगर्जीपणाचा बळी
असंवेदनशिल असलेल्या नागपूर पोलिसांचा मन्नत ही बळी ठरली आहे. मगंळवारी विशाल हा बहीण मन्नत हिच्यासोबत कपीलनगर पोलीस ठाण्यात आला होती. त्याने ठाणेदार अजय आकरे यांची भेट घेऊन तक्रार केली. त्याने बहिणीच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. मात्र, ठाणेदार आकरे यांनी या तक्रारीची वेळीच दखल घेतली नाही. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नाही. आकरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून हलगर्जीपणा न करता गुन्हा दाखल करून कारवाई केली असती तर ही घटना टळली असती. यापूर्वीसुद्धा वाठोड्याचे ठाणेदार विजय दिघे यांनी आरोपींच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवले नव्हते. त्यामुळे आकरे यांच्याबाबत शिस्तप्रीय पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.