Today Nagpur News Updates : राज्यात अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून सर्वाधिक मुली नागपुरातून बेपत्ता झाल्या आहेत. उपराजधानीतून गेल्या १५ महिन्यांत १२ ते १७ वर्षे वयोगटातील ४७१ मुलींनी घरातून पलायन केले. तसेच १२१ अल्पवयीन मुलेसुद्धा बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांकडे आहे. राज्यातील तापमानाचा पारा वाढतच चालला असून विदर्भ होरपळून निघत आहे. येथील तापमान आता ४५ अंश सेल्सिअसच्या जवळ जाऊन पोहचले असून राज्यातच नाही तर देशात विदर्भातील शहरे सर्वाधिक तापमानाच्या यादीत अग्रक्रमावर आहेत. तेव्हा नागपूरसह विदर्भातील विविध क्षेत्रातील घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल…

Live Updates

Nagpur Vidarbha Maharashtra News, 21 April 2025

07:56 (IST) 22 Apr 2025

शिक्षण विभागापुढे आता आव्हान अभ्यासक्रमनिर्मितीचे, अन्य भारतीय भाषांसाठीच्या पाठ्यक्रमासाठी वेळ कमी

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ची शालेय स्तरावरील अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२५-२६पासून करण्यात येणार आहे. …वाचा सविस्तर
16:37 (IST) 21 Apr 2025

Video : बिबट्याने चक्क पाईपमध्येच ठाण मांडले, वनकर्मचाऱ्यांची मात्र तारेवरची कसरत

प्राणी मित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने शेवटी त्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले आणि मग त्याने थेट जंगलात धूम ठोकली …अधिक वाचा
15:37 (IST) 21 Apr 2025

दोन राज्यात भाजपच्या सर्व उमेदवारांना समर्थन…  रामदास आठवले म्हणतात…

आरपीआय आठवले पक्षाची नागपुरातील रवीभवन येथे विदर्भ स्तरीय बैठक झाली. त्यामध्ये भाजपच्या उमेदवारांना समर्थन देणार असल्याची महत्वाची घोषणा केली. …सविस्तर वाचा
15:11 (IST) 21 Apr 2025

आमदाराची अशीही लोकसेवा… उन्हातान्हातून जनसंपर्क कार्यालयात आलेल्यांना देतात चक्क…

आमदार राजू कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात गेलात की तुमच्या हातात आधी पाण्याचा पेला येतो. नंतर काटोकाठ आंबिलीने भरलेली प्लास्टिकची मोठी वाटी येते. …सविस्तर वाचा
14:32 (IST) 21 Apr 2025

कुंभमेळ्याची तयारी अन महिलांना पाण्यासाठी विहिरीत उतरण्याची वेळ

राज्य सरकार नाशिक येथे कुंभमेळ्याची जोरदार तयारी आहेत. त्यासाठी ५ हजार कोटी खर्च केला जाणार आहे. पण, याच नाशिक जिल्ह्यात पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून महिलांना जीव धोक्यात घालून विहिरीत उतरण्याची वेळ येत आहे. …अधिक वाचा
14:11 (IST) 21 Apr 2025

धक्कादायक! चक्क भाजप आमदारांना ठाणेदाराची शिवीगाळ, पोलिसाची मुजोरी; गोवंशाच्या अवैध वाहतुकीवरून…

केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असतांना सत्ताधारी पक्षाचे मूर्तिजापूर येथील आमदार हरीश पिंपळे यांना चक्क बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराने अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री घडला. …अधिक वाचा
14:03 (IST) 21 Apr 2025

नखगळतीचे रुग्ण वाढतेच! शेगाव तालुक्यात संयुक्त संचालकांची भेट, केंद्राचे पथकही येणार

बुलढाणा : जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यात केसगळती व टक्कल आजाराची दहशत कायम आहे. चार महिन्यांनंतरही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा (आयसीएमआर) अहवाल लालफीतशाहीतच अडकला आहे. यामुळे बाधित गावे आणि रुग्णांतील भीती कायम आहे.या पाठोपाठ शेगाव तालुक्यात आता नखगळतीचे संकट उभे ठाकले आहे. ग्रामस्थांची नखें कमकुवत होऊन गळून पडत आहे.

सविस्तर वाचा…

14:02 (IST) 21 Apr 2025

आता शाळांमध्‍ये सखोल पडताळणी मोहीम…

अमरावती : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सुविधांचा आढावा घेण्यासाठी येत्या १५ मे २०२५ पर्यंत व्यापक तपासणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचा उद्देश शाळांमधील भौतिक आणि शैक्षणिक सुविधांचा तपशीलवार अभ्यास करून त्यातील त्रुटी दूर करणे आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देणे आहे.

सविस्तर वाचा…

14:01 (IST) 21 Apr 2025

केसगळतीने हातपाय पसरले; चिखली, मेहकरात सहा रुग्ण

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याचे भौगोलिक रित्या घाटावर आणि घाटाखाली असे भाग पडतात. राजकारण आणि सामाजिकदृष्ट्या देखील असेच चित्र आहे. या घाटाखालील तीन तालुक्याना चार महिन्यापासून छळणाऱ्या केसगळती आणि टक्कल या गूढ आणि विचित्र आजाराने आता घाटावरील तालुक्यातही चंचू प्रवेश केल्याचे धक्कादायक चित्र आहे.

सविस्तर वाचा…

14:00 (IST) 21 Apr 2025

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, अपहरण करून रेल्वेने पळून जाताना…

नागपूर : एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण करून रेल्वेने पळून घेऊन जाणाऱ्या प्रियकराला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. नागपूर पोलिसांनी व्हॉट्सॲपवर पाठविलेल्या छायाचित्रावरून पथकाने त्याचा शोध घेतला. चौकशी केल्यानंतर बुटीबोरी पोलिसांच्या स्वाधीन केले.

सविस्तर वाचा…

13:59 (IST) 21 Apr 2025

शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख अंकुश कडू हत्याकांडाचा ‘लाईव्ह व्हिडिओ व्हायरल’

नागपूर : शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख आणि भूखंड विकासक अंकुश कडू हत्याकांडाचा ‘ लाईव्ह व्हिडिओ’ अनेकांच्या ‘मोबाईलवर व्हायरल’ झाला. हजारो लोकांनी हे हत्याकांड कसे घडले? हे बघितले. मात्र, कपिलनगर पोलिसांना अद्यापर्यंत आरोपींचा सुगावा लागला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणाली आणि कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मारेकऱ्यांच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

सविस्तर वाचा…

13:59 (IST) 21 Apr 2025

हाताची बोटे कापली, ब्लेडने वार, लोखंडी रॉडने इतके मारले की… क्रूर हत्येत १४ आरोपी अटकेत; धार्मिक वाद की…

नागपूर : भंडारा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. केवळ चोरीच्या आरोपावरून भिक्षा मागून, प्लास्टीकचा कचरा गोळा करून स्वत:चा उदरनिर्वाह करणाऱ्या सोनझारी समाजाच्या एक तरुणाची निघृण हत्या करण्यात आली. तर अन्य तीन तरुणांना बेदम मारहाण झाली असून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.

सविस्तर वाचा…

13:58 (IST) 21 Apr 2025

बालगुन्हेगारी नियंत्रणासाठी ‘केअर’च्या धर्तीवर ‘हेल्पडेस्क’

नागपूर : वाढत्या बालगुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात ‘केअर’ नावाने पहिला हा उपक्रम नागपुरात राबविण्यात आला होता. आता ‘केअर’च्या धर्तीवर राज्यभरात ‘हेल्पडेस्क’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गृहमंत्रायलयाने सकारात्मकता दाखविल्यामुळे या उपक्रमासाठी राज्यातील पाच शहरांची निवड करण्यात आली आहे. 

सविस्तर वाचा…

13:57 (IST) 21 Apr 2025

राज्यातील तापमानाची स्थिती गंभीर, हवामान खात्याचा इशारा…

नागपूर : राज्यातील तापमानाचा पारा वाढतच चालला असून विदर्भ होरपळून निघत आहे. येथील तापमान आता ४५ अंश सेल्सिअसच्या जवळ जाऊन पोहचले असून राज्यातच नाही तर देशात विदर्भातील शहरे सर्वाधिक तापमानाच्या यादीत अग्रक्रमावर आहेत. एवढेच नाही तर जगभरातील सर्वाधिक तापणाऱ्या शहराच्या यादीत विदर्भातील शहरे पहिल्या दहामध्ये आहेत.

सविस्तर वाचा…

13:56 (IST) 21 Apr 2025

अरे, हा पक्षी जमिनीवर ? नेहमी आकाशातच असतो, अशी चर्चा असल्याने आश्चर्य

वर्धा : निसर्गात विविध प्राणी, पक्षी, विविध जीवजंतू असतात. त्यांच्या हालचालीविषयी मानवांमध्ये नेहमी कुतूहल वाटत आले आहे. त्यातूनच मग वेगवेगळ्या कथा प्रसूत होत असतात. जसे घुबड हा पूर्ण मान फिरवतो. त्याची नजरानजर झाल्यास गर्भवती महिलेस धोका संभवतो. पण या केवळ आख्यायिका असून त्यात तथ्य नसल्याचे पक्षी अभ्यासक स्पष्ट करतात.

सविस्तर वाचा…

13:55 (IST) 21 Apr 2025

१५ महिन्यांत उपराजधानीतून ४७१ मुली बेपत्ता, प्रेमप्रकरणातून पलायन

नागपूर : राज्यात अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून सर्वाधिक मुली नागपुरातून बेपत्ता झाल्या आहेत. उपराजधानीतून गेल्या १५ महिन्यांत १२ ते १७ वर्षे वयोगटातील ४७१ मुलींनी घरातून पलायन केले. तसेच १२१ अल्पवयीन मुलेसुद्धा बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांकडे आहे.

सविस्तर वाचा..

 

नागपूर ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेट्स