Today Nagpur News Updates अल्पवयीन भाचीवर चुलत मामाची वाईट नजर पडली. त्या नराधम मामाने आपल्या भाचीवरच लैंगिक अत्याचार केले. अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाल्यामुळे हा धक्कादायक प्रकार अकोल्यात उघडकीस आला. नातेवाईकांचीच मुलींवर वाईट नजर राहत असल्याचे अनेक धक्कादायक प्रकार आतापर्यंत राज्यात उघडकीस आले. राज्यातील तापमानाचा पारा वाढतच चालला असून विदर्भ होरपळून निघत आहे. येथील तापमान आता ४५ अंश सेल्सिअसच्या जवळ जाऊन पोहचले असून राज्यातच नाही तर देशात विदर्भातील शहरे सर्वाधिक तापमानाच्या यादीत अग्रक्रमावर आहेत. तेव्हा नागपूरसह विदर्भातील विविध क्षेत्रातील घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल…

Live Updates

Nagpur Breaking News Today, 22 April 2025

15:10 (IST) 22 Apr 2025

प्रशासकीय गतिमानतेवर ‘नागपुरी’ मोहोर

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता व सुशासन शाखेतर्फे दरवर्षी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान राबवले जाते.

सविस्तर वाचा…

14:42 (IST) 22 Apr 2025

पाणी पेटले! बुलढाणा जिल्ह्यातील दीड लाखांवर ग्रामस्थांची तहान…

मागील वर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडला, त्यातच अवकाळी पण बरसला. या ऊप्परही पाणी टंचाईने फेब्रुवारी मध्येच डोके वर काढले.

सविस्तर वाचा…

14:41 (IST) 22 Apr 2025

Akola Crime News : नात्याला काळिमा! अल्पवयीन भाचीवर मामाकडून अत्याचार; गर्भधारणा झाली अन्…

आपल्या स्वतःच्या घरात देखील अल्पवयीन मुली सुरक्षित नसल्याचे चित्र सध्या समाजात निर्माण झाले आहे. नातेवाईकांचीच मुलींवर वाईट नजर राहत असल्याचे अनेक धक्कादायक प्रकार आतापर्यंत राज्यात उघडकीस आले.

सविस्तर वाचा…

14:40 (IST) 22 Apr 2025

Bhandara Accident: भंडाऱ्यात भीषण दुर्घटना… भरधाव कारने दुचाकीला उडवले, आईवडिलांसह चिमुकलीचा मृत्यू

अपघातानंतर कारचालक घटनास्थळी वरून पसार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. फिर्यादी विजय सोमा कंगाली यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

नागपूर ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेट्स

नागपूर ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेट्स