नागपूर : केंद्रीय अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील सीमाशुल्कात मोठ्या कपातीच्या घोषणेनंतर नागपूरसह देशभरात प्रथम सोने- चांदीचे दर प्रथम चांगलेच घसरले. परंतु कालांतराने पुन्हा दरवाढ सुरू होऊन ऑगस्टच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर ७० हजारावर पोहचले होते. परंतु आता पुन्हा सोन्याचे दर चांगलेच वाढतांना दिसत असून बघता- बघता हे दर प्रति दहा ग्राम ७२ हजाराच्या जवळ पोहचतांना दिसत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपुरातील सराफा बाजारात ३ ऑगस्टला सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७० हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६५ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५५ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार ९०० रुपये होते. हे दर ८ ऑगस्टला दुपारी निच्चांकी पातळीवर आले. यादिवशी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ६९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६४ हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५४ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ४५ हजार रुपयापर्यंत खाली आले. तर प्लॅटिनमचेही दरही प्रति दहा ग्राम ४३ हजार रुपये होते.

हेही वाचा…‘शरद पवारांना भेटण्याची संधी सोडणार कशी’? डॉक्टरांची मनाई तरी हे भाजप नेते वर्ध्यात दाखल

दरम्यान आता सोन्याचे दर चांगलेच वाढत असून ग्राहकांमध्ये दरवाढीनंतर दागिने नेमके खरेदी करायचे केव्हा? ही चिंता सतावत आहे. दरम्यान नागपुरात १७ ऑगस्टला सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७१ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६६ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५६ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ७०० रुपये होते. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पानंतर काही महिने सोन्याचे दर घसरल्यावर आता सातत्याने त्यात वाढ नोंदवली जात आहे. दरम्यान सराफा व्यवसायिकांकडून आणखी दर वाढण्याचे संकेत दिले जात असून ही सोने- चांदीचे दागिने खरेदीसाठी चांगला काळ असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान प्लॅटेनियमचे दरही १७ ऑगस्टला प्रति दहा ग्राम ४३ हजार रुपये नोंदवले गेले. हे दर केंद्रीय अर्थसंकल्पानंतर स्थिर आहे, हे विशेष.

हेही वाचा…Video : आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीने कापला केक; मुलाचा वाढदिवस जल्लोषात

चांदीच्या दरातही मोठी घसरण

नागपुरातील सराफा बाजारात १७ ऑगस्टला चांदीचे दर ८३ हजार ८०० रुपये प्रति किलो नोंदवले गेले. हे दर २ ऑगस्टला रात्री बाजार बंद होतांना ८४ हजार ६०० रुपये तर ३ ऑगस्टला ८२ हजार ८०० रुपये प्रति किलो होते. त्यामुळे चांदीच्या दरातही सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur bullion market sees gold prices rises mnb 82 psg