नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जम्मू-काश्मीर, लेह-लडाख यासह अतिशय दुर्मिळ भागात रस्ते बांधणी, पूल उभारण्याचे करीत आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. एनएचएआयने अनेक रस्ते विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे. परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जिल्ह्यातील नागपूर- हैदराबाद दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील बुटीबोरी उड्डाण पूल साडेतीन वर्षांत खचल्याने एनएचएआयच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एनएचएआयने ६.४ किमी लांबीचा मुख्य सोनमर्ग बोगदा बांधला आहे. तो काल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तसेच झोजिला बोगदा २०२८ साला पर्यंत पूर्ण होणार असून सोनमर्ग प्रकल्पामुळे या मार्गाचे अंतर ४९ किमी वरून ४३ किमी इतके कमी होईल. यामुळे श्रीनगर खोरे ते लडाख पर्यंत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १ वरील प्रवास अधिक सुरळीत होणार आहे. एकीकडे समुद्रसपाटीपासून ८ हजार फुटांहून अधिक उंचीवर बोगदा बांधण्यात येत आहेत. मात्र, साडेतीन वर्षांतच तडे गेल्याने बुटीबोरी पुलाची व्हीएनआयटीकडून तपासणी सुरू असून या पुलाला पाडून नवीन बांधायचे की डागडूजी करायची यासंदर्भात अद्याप निर्णय झाला नाही. दरम्यान, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अंदाजानुसार हा पूल ९ एप्रिलपर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता नाही. त्यामुळे चंद्रपूर आणि वर्धेकडून येणारी वाहतूक समृद्धीमार्गे वळण्यात आली आहे.

हेही वाचा – राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू

नागपूर-चंद्रपूर आणि नागपूर-वर्धा मार्गाला जोडणारा आणि पुढे हैदराबादकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील बुटीबोरी येथील उड्डाणपुलाला तडे गेल्याने या पुलावरून २४ डिसेंबर २०२४ पासून वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पुलाची तपासणी त्रयस्थांकडून केली जात असून त्यासाठी व्हीएनआयीची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेच्या तज्ज्ञांनी तपासणी सुरू केली आहे. पुलाचा खचलेला भाग पाडून नवीन बांधयची की पुलाची दुरुस्ती करायची, याबाबतचा निर्णय व्हीएनआयटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर होणार आहे. खचलेल्या पुलाचे नेमके काय करायचे यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे एनएचएआयचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले.

हेही वाचा – एसटी बँक लाच प्रकरणात महत्वाची अपडेट… तर घबाड बाहेर येईल

पूल खाली सरकला

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ हा नागपूरहून हैदराबादकडे जातो. तसेच विदर्भातील प्रमुख जिल्हे चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ हे नागपूरला या मार्गाने जोडले गेले आहे. या अतिशय वर्दळीच्या मार्गावर बुटीबोरी एमआयडीसीकडे जाणारा मार्ग जोडला गेला आहे. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होते. बुटीबोरी उड्डाणपुलाचे बांधकाम २०१८ मध्ये सुरु झाले आणि २०२१ मध्ये पूर्ण झाले. महामार्ग प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार १८७ टन वजनाचा मालवाहक (ट्रेलर) पुलावरून गेल्यानंतर पुलाच्या ‘कॅन्टीलिव्हर’च्या पायाचे प्लास्टर निघाले. त्यामुळे पूल खाली सरकला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur butibori bridge case question mark on the work of national highway bridge cracked in three and a half years rbt 74 ssb