नागपूर : भरकटलेल्या वन्यप्राण्यांच्या पिल्लांचे त्यांच्या आईसोबत पुनर्मिलन घडवून आणणे हेसुद्धा यशस्वी वन्यजीव संवर्धनाचे एक उदाहरण आहे. मातृत्व जोपासण्याकरिता आई ही कुठलाही प्रसंग स्वतःच्या जिवावर ओढून घेण्याकरिता सक्षम असते यात दुमत नाही. मग आई ही हिंस्र श्वापदाची असो किंवा बुद्धीजिवी माणसाची.

याचे नुकतेच उदाहरण म्हणजे वर्धा जिल्ह्यातील हिंगणीलगतच्या बोरखेडी खैरी बिट जुवाडी येथील अशोक उमक यांच्या शेतात सोयाबीन काढणी सुरू असताना अचानक त्या ठिकाणी बिबट्याचे २५ दिवसांचे दोन बछडे आढळून आले. गावकऱ्यांनी लगेच या घटनेची माहिती वनविभागाला दिली. सदर घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी हिंगणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय आगाशे, वनरक्षक अस्लम मौजाण, वनमजूर संजय परासे व पीपल फॉर एनिमल्स वन्यजीव बचाव केंद्राचे कौस्तुभ गावंडे, डॉ रोहित थोटा ईतर वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तेथे त्यांना दोन बछडे दिसून आले. त्यांनी लगेच त्या बछड्याना ताब्यात घेत त्याला पुढील तपासणीकरिता पीपल फॉर एनिमल वन्यजीव बचाव केंद्र येथे नेण्यात आले व त्याठिकाणी त्याची पाहणी तेथील संचालक आशीष गोस्वामी, वन्यजीव विभाग प्रमुख कौस्तुभ गावंडे यांनी केली व डॉ रोहित थोटा यांनी प्राथमिक तपासणी केली असता दोन्ही बछडे सुदृढ असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनतर सदर बछड्याना त्याच्या आईसोबत पुनर्मिलनासाठी त्याच ठिकाणी जाऊन शास्त्रोक्त पद्धतीने प्रयत्न सुरू करण्यात आले व ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरेही बसविण्यात आले. हिंगणी वनपरिक्षेत्रातील कर्मचारी व पीपल फॉर एनिमल्सच्या वन्यजीव केंद्रातील चमू यांच्या संयुक्त विद्यमाणे सदर मोहीम राबविण्यात आली व दोन्ही बछड्यांना एका मोठ्या बास्केटच्या मदतीने योग्य ठिकाणी ठेवण्यात आले व लाईव्ह कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून रात्रभर पाळत ठेवण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास सदर बछड्याचे आपल्या आईसोबत पुनर्मिलन यशस्वीरित्या पार पडले.

Rashmi Joshi, cancer, support, Rashmi Joshi news,
रश्मी जोशी… कॅन्सरग्रस्तांसाठी आधारवड!
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
sonam wangchuk s indefinite hunger strike
सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
Loksatta ulta chashma
उलटा चष्मा: दिल्लीचे चतुर!
Hezbollahs influence hasan nasarullah
“लेबनॉनवर हल्ले म्हणजे युद्धाची घोषणा”; हिजबुलच्या प्रमुख नेत्याचं वक्तव्य, कोण आहेत हसन नसराल्लाह?
Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना
america parents punished for kids crime,
विश्लेषण: अल्पवयीन मुलांच्या गंभीर गुन्ह्यांसाठी पालकांनाच अटक? अमेरिकेतील दोन राज्यांचा अनोखा पायंडा… भारतात काय स्थिती?

हेही वाचा – नागपुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी

“यावर्षी मागील जून महिन्यात हिंगणी वनपरिक्षेत्रात हिवरा या गावात बिबट्याचा बछडा आढळून आला होता व त्याचे यशस्वी पुनर्मिलनसुद्धा आईसोबत झाले. सात ऑक्टोबरला याच परिसरात जुवाडी भागात २५ दिवसांचे आणखी दोन बछडे सापडले व त्याचे देखील आईसोबत पुनर्मिलन घडवून आणण्यात वनविभाग व पीपल फॉर एनिमल्सला यश आले आहे. ” – अक्षय आगाशे, वनपरिक्षेत्र अधिकारी, हिंगणी

हेही वाचा – नागपूर : ‘रेड लाइट एरिया’तील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यांची अखेर उचलबांगडी; लोकसत्ताच्या वृत्ताची दखल

“बिबट्याची मादी आणि बछड्यांची ताटातूट झाली तर मादी आक्रमक होते. अशा वेळी ती हल्ले करण्याचा धोका असतो. पण शास्त्रोक्त पद्धतीने जर त्यांचे आईसोबत पुनर्मिलन केले तर हा धोका निश्चितच कमी होतो. सध्या भारतात सर्वत्र सुरू असलेल्या वन्यजीव सप्ताहात आईपासून दुरावलेल्या या दोन बछड्यांचे पुनर्मिलन घडवून आणणे ही वन्यजीव प्रेमींकरिता आनंदाची बाब आहे.” – कौस्तुभ गावंडे, विभाग प्रमुख वन्यजीव, पीपल फॉर एनिमल्स, वर्धा