नागपूर : शहराजवळील बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत जेएसडब्ल्यू कंपनीला लिथियम- आयन बॅटरी प्रकल्प उभारण्यासाठी सलग ६०० एकर जमीन हवी आहे. परंतु सलग एवढी जमीन अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसीत उपलब्ध नसल्याने राज्य सरकारने ४५० एकर जमीन देऊ केली आहे.

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी जेएसडब्ल्यू समूह नागपुरात गुंतवणूक करीत असल्याची घोषणा केली होती. तसेच त्यावेळी घोषणा झालेल्या फ्रान्सच्या पर्नो रिका कंपनीचे ‘माल्ट डिस्टिलरी अँड मॅन्युफॅक्चरिंग’ आणि अवाडा ग्रुपच्या अवाडा इलेक्ट्रो या नवीन प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. जेएसडब्ल्यू कंपनीला प्रस्ताव पत्र देण्यात आले आहे. ही कंपनी पहिल्या टप्प्यात १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – नागपूरच्या पालकमंत्रीपदावरून तर्कवितर्क

सेलफोनपासून इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत बॅटरीचे वेगवेगळे उपयोग आहेत. एमआयडीसीच्या बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत कंपनीला ४५० एकर जमीन देऊ करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात लिथियम बॅटरी प्लांटचा समावेश असेल आणि नंतर इतर उत्पादनांच्या श्रेणींसाठी ही सुविधा वाढवली जाण्याची शक्यता आहे.

अवाडा ग्रुप ही दुसरी एक कंपनी मार्चपर्यंत उत्पादनाचा पहिला टप्पा सुरू करणार आहे. बांधकाम जोरात सुरू असल्याची माहिती आहे. यावर्षी ऑक्टोबरमध्ये बुटीबोरी येथे ‘अवाडा’ने आपल्या सौर मॉड्यूल आणि इलेक्ट्रोलायझर प्रकल्पाची पायाभरणी केली. वर्षभरात उत्पादन सुरू होईल, असा कंपनीचा विश्वास आहे. १३ हजार कोटी रुपयांपर्यंत ही कंपनी गुंतवणूक करणार आहे.

हेही वाचा – ईव्हीएम विरोधातील लढाईची दिशा मारकडवाडीने देशाला दिली: अतुल लोंढे

“जेएसडब्लू कंपनीला सलग ६०० एकर जमीन हवी आहे. तेवढी सलग जमीन उपलब्ध नाही. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘अवाडा’ कंपनी आणि पर्नाड कंपनीचे काम सुरू झाले आहे.” – मनोहर पोटे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी.

Story img Loader