नागपूर : शहरात गेल्या काही महिन्यांपासून सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. मुंबई, दिल्ली,कोलकाता, जम्मू-काश्मीर आणि पंजाब राज्यातील तरुणींना देहव्यवसायासाठी नागपुरात आणल्या जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई-दिल्लीतील तरुणी असलेल्या कपिलनगरातील एका ओयो हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ‘सेक्स रॅकेटॅवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (एसएसबी) धाड मारली. या ठिकाणाहून पोलिसांनी देहव्यापार करणाऱ्या मुंबई आणि दिल्लीच्या दोन तरुणींना ताब्यात घेतले. महिला दलालासोबतच हॉटेल मालकाविरुध्द कपिलनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात एक ठार

पूजा दहीकर (३६) रा. नवीन इंदोरा, झोपडा आणि यशराज चौकसे (२९) रा. बेसा असे आरोपींचे नाव आहे. पूजा ही फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. पूजा हिच्याविरूध्द यापूर्वीही देहव्यापारात दलाली केल्याच्या गुन्ह्याची नोंद आहे. तिनेच दिल्ली, मुंबईहून तरुणींना देहविक्रीसाठी नागपुरात बोलाविले होते असा पोलीस तपासात खुलासा झाला.

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती की, कपिलनगर परिसरातील ओयो हॉटेल पॅराडाईस स्टे इन, रमाईनगर येथे सेक्स रॅकेट सुरू असून दलाल महिलेच्या माध्यमातून मुंबई, दिल्लीतील तरुणींना बोलाविण्यात आले आहे. मुलींना आंबटशौकीन ग्राहकांना उपलब्ध करून देहविक्रीचा व्यवसाय सुरू आहे. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कारवाई केली. आरोपी हे स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी  पीडित दोन तरुणींना झटपट पैसे कमविण्याचे आमिष देऊन त्यांच्याकडून देहव्यवसाय करून घेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दोन पीडित तरुणींची देहव्यापाऱ्याच्या दलदलीतून सुटका केली.

हेही वाचा >>> सावधान ! बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ

आरोपींकडून मोबाईलसह रोख असा १९ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.फरार आरोपी पूजा दहीकर हिचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक कविता ईसारकर, शिवाजी नन्नावरे, सचिन बढिये, लक्ष्मण चवरे, प्रकाश माथनकर, अजय पौनिकर, शेषराव राऊत, अश्विन मांगे व लता गवई यांनी केली.

कपीलनगर पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष?

ओयो हॉटेल पॅराडाईस स्टे इन, हे हॉटेल कपीलनगर पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे. कपीलनगरच्या ठाणेदाराच्या आशिर्वादाने हा अड्डा सुरु होता, अशी चर्चा आहे. या हॉटेलमध्ये छापा पडताच एक वस्तीतील तथाकथित नेता पूजा हिच्या बचावासाठी आला होता. त्याने पोलिसांवर दबाव टाकून कारवाई करण्यात अडथळा निर्माण केल्याची माहिती समोर आली आहे. या हॉटेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मॉडेलिंग करणाऱ्या तरुणींकडून देहव्यापार सुरु असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur city police bust sex racket at hotel oyo adk 83 zws