नागपूर : महापालिकेच्यावतीने स्वच्छ नागपूर सुंदर नागपूर ही संकल्पना राबवल्या जात आहे. शहरात अस्वच्छता करणाऱ्या उपद्रवींवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपद्रवी शोध पथकाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या कारवाईनंतर गेल्या तीन वर्षांत १ लाख ४७ हजार ६४५ लोकांवर कारवाई करण्यात आली असून १८ कोटी ४१ लाख ५९ हजार रुपये वसूल करण्यात आले आहे.

सुंदर नागपूर स्वच्छ नागपूरअंतर्गत शहरात अस्वच्छता निर्माण करणाऱ्यावर करडी नजर ठेवण्यासाठी महापालिकेत तीन वर्षांपूर्वी उपद्रवी शोध पथकाची नियुक्ती करण्यात आल्यानंतर २०१ जवानांची पथकामध्ये नियुक्ती करण्यात आली होती. रस्त्यावर कचरा करणाऱ्या आणि थुंकणाऱ्यांना, उघड्यावर लघुशंका करणाऱ्यावर, दुकानासमोर कचरा करणे, रस्त्यावर कुठेही जाहिरात फलक लावणे, रस्त्यावर घर बांधकाम साहित्य ठेवणे इत्यादी कारणासाठी नागरिकांना शिस्त लागावी या दृष्टीने पथकाच्या माध्यमातून कारवाई करत दंड आकारणे सुरू केले. मात्र काही समाजकंटक रस्त्यावर कचरा टाकणे, थुंकणे, उघड्यावर लघुशंका करत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा उपद्रवी लोकांवर चाप लावण्यासाठी उपद्रव शोध पथकाने कडक कारवाई सुरू केली.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
Railway Accident in bihar
Railway Worker Crushed : एक्स्प्रेस पुढे जाण्याऐवजी मागे आली अन् रेल्वे कर्मचारी चिरडला; बिहारमध्ये भीषण अपघात!
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

हेही वाचा – “शरद पवार हाजीर हो,” खामगाव तहसीलदारांची नोटीस; मात्र…

२०२१ ते २०२२ या काळात ४० हजार ८२७ लोकांवर कारवाई करत ६ कोटी ६३ लाख १७ हजार १७५ दंड वसूल केला. २०२२-२३ या काळात ५५ हजार ५०३ लोकांवर कारवाई करत ५ कोटी ८४ लाख ३७ हजार ३५० तर २०२३ ते २४ (३१ मार्च पर्यंत) ५१ हजार ३१५ लोकांवर कारवाई करत ५ कोटी ९४ लाख ५ हजार ३५० हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. स्वच्छ आणि सुंदर नागपूर शहरासाठी सर्वंकष स्वच्छता मोहिमेसह महापालिका उपद्रवी शोध पथकाच्या माध्यमातून शहराला शिस्त लावण्यासाठी काम करत आहे. त्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असून या प्रयत्नांना काही प्रमाणात यश मिळत असले तरी काही ठिकाणी या व्यवस्थेला नागरिकच हरताळ फासत असल्याची व्यथा उपद्रवी शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – रुग्णांच्या जीवाशी खेळ, नागपुरातील ११९ हॉस्पिटल्समध्ये अग्निशमन सुरक्षा कार्यान्वित नाही

स्वच्छतेमध्ये नागपूर महापालिकेचा क्रमांक घसरत असताना उपद्रवी शोध पथकाच्या माध्यमातून स्वच्छतेच्या दृष्टीने येणाऱ्या काळात अधिक कडक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान महापालिका क्षेत्रातील सर्व दुकानदार, हॉकर्स, हातठेलेधारक, फेरीवाले तसेच इतर सर्व व्यावसायिकांना त्यांच्या आस्थापनेवर कचरापेटी ठेवणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास आणि आस्थापनेच्या १० चौरस फूट परिसरात अस्वच्छता आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या उपद्रवी शोध पथकाकडून देण्यात आला.