नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून शहरात देहव्यापाराचे अड्डे वाढले असून अल्पवयीन मुलींसह महाविद्यालयीन तरुणी झटपट पैसा कमावण्याच्या नादात या दलदलीत अडकू लागल्या आहे. गुन्हे शाखेने रविवारी दोन देहव्यापाराच्या अड्ड्यांवर घातलेल्या छाप्यातून ही बाब उघड झाली.

सदरमधील छावणी भागातील एका सलूनच्या आड सुरू असलेल्या देहविक्री अड्ड्यावर पोलिसांनी छापा घातला. तेथून चार तरुणींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सलून चालक महिलेसह दोन ग्राहक, अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. साक्षी ऊर्फ मनीषा चंद्राहास तुपे (३०, रा. उर्वेला कॉलोनी, वर्धा रोड), राकेश साबुलाल बंदेवार ऊर्फ राज ठाकूर (३३, रा. उज्ज्वलनगर, सोमलवाडा), अभिषेक प्रभाकर माहुरे (३२, रा. प्लॉट नं. ८९ मनीषनगर), मोहन भगवंतराव सुरकर (४०, रा. निलडोह, हिंगणा) व राजेंद्र चिंतमणराव पांडे (५२, रा. वानाडोंगरी, हिंगणा), अशी आरोपींची नावे आहेत.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र

हेही वाचा – विदर्भात स्फोट बळी वाढताहेत, पण ‘बर्न वॉशिंग युनिट’ नाही!

आरोपी महिला मनीषा तुपे छावणी येथील ‘द लुक लक्झरी सलून स्पा’मधून देहव्यापार चालवायची. गेल्या ६ वर्षांपासून ती या व्यवसायाशी जुळलेली आहे. अल्पवयीन मुली आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना जाळ्यात ओढून त्यांना ब्युटी पार्लरमधून आंबटशौकीन ग्राहकांकडे पोहोचवण्याचे काम ती करीत होती. मनीषाने आतापर्यंत याच व्यवसायातून लाखोंची कमाई केली. तिने शंभरावर मुलींना शहरातील वेगवेगळ्या स्पा-सलूनमध्ये देहव्यापारासाठी पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

मनीषाबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखेने एक बनावट ग्राहक तेथे पाठवला. मनीषाने एका तरुणीला त्याच्यासोबत पाठवले. त्याने इशारा करताच पोलिसांनी छापा घातला. आरोपी मनीषा, राकेश व अभिषेक हे चार तरुणींना देहव्यापार करण्यास प्रवृत्त करताना आढळले. याशिवाय, मोहन व राजेंद्र हे तिथे ग्राहक म्हणून मिळून आले. पोलिसांनी आरोपींच्या तावडीतून त्या चारही तरुणींची सुटका केली आणि २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई सदर पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, नंदकिशोर देवगडे, जयंता, राधा, नीलिमा, आशीष, प्रमोद यांनी केली.

हेही वाचा – नागपूर : उड्डाणपुलानंतरही उमरेड मार्गावरील वाहनांची वर्दळ कायम, सक्करदरा चौकाला…

ऑनलाईन देहविक्री अड्ड्यावर एसएसबीचा छापा

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ऑनलाईन देहविक्री अड्ड्यावर छापा टाकून एका महिलेस पकडले. स्मिता ऊर्फ आरती (३७, रा. इमामवाडा) असे अटकेतील दलाल महिलेचे नाव आहे. तिचा साथीदार सलमान ऊर्फ रोशन डोंगरे (३०, रा. अंबाझरी) या दोघांविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यावेळी एका पीडित युवतीची सुटका करण्यात आली. दलाल महिलेचा साथीदार सलमानचा शोध पोलीस घेत आहेत. आरती आणि सलमान हे दोघेही पीडित मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहविक्री करून घेत होते.