नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मानसिकता महिलाविरोधी आहे. त्यामुळे त्यांनी बदलापूर आणि पश्चिम बंगालच्या घटनेबाबत मौन बाळगले आहे, अशी टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. रागिणी नायक यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर डॉ. रागिणी नायक यांनी शुक्रवारी नागपूर पत्रकार क्लबमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विशाल मुत्तेमवार, अजित सिंह उपस्थित होते.

हेही वाचा…कंत्राटदारांकडून खंडणी, निरपराधांना तुरुंगात टाकले…. ‘आयएएस’ अधिकाऱ्याचे नवनवीन प्रताप…..

डॉ. नायक यांनी राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाची आकडेवारी देत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. त्या म्हणाले, देशात रोज ८६ आणि महाराष्ट्रात रोज २१ बलात्कार होतात. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये २०१९-२०२३ या काळात ९६ टक्यांनी वाढ झाली आहे. याबाबत मोदी, शिंदे, फडणवीस बोलत नाहीत. भाजपची वाशिंग मशीन केवळ भ्रष्टाचाऱ्यांसाठीच नाहीतर बलात्काऱ्यांसाठीदेखील आहे. पंतप्रधान बलात्काराच्या आरोपीसाठी मत मागतात. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील मागे नाही. मोहन भागवत यांनी अनेकदा महिलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मात्र, बदलापूर घटनेबाबत ते मौन पाळत आहेत. त्यांना केवळ दसऱ्याच्या दिवशी भाषण देताना ‘नारी-शक्ती’ आठवते. पण, महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत असताना संघ, भाजप, मोदी, शिंदे किंवा फडणवीस काहीही बोलत नाहीत, अशी टीका करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदलापूरच्या घटनेवर किंवा कोल्हापूरच्या घटनेवर कोणतेही ट्विट का केले नाही. शक्ती फौजदारी कायदा कधी होणार, असा सवाल नायक यांनी केला.

पिडीत मुलींच्या आईला १२ तास पोलीस ठाण्यात का ताटळत ठेवण्यात आले. बदलापूर घटनेची तक्रार दाखल करण्यास विलंब का करण्यात आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकार संवेदनशील असते तर त्यांनी या घटनेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला नसता. उच्च न्यायालयाला या प्रकरणाची स्व:तहून दखल घ्यावी लागली नसती आणि न्यायाच्या मागणीसाठी लोकांना रस्त्यावर उतरावे लागले नसते.

हेही वाचा…नेता अडकला, पण कार्यकर्ते खंबीर…मुंबईच्या रस्त्यावर आत्महत्येचे प्रात्यक्षिक…

सरकार जनतेचे रक्षक समजले जाते. परंतु गेल्या दहा वर्षातील अनुभव बघता रक्षकच भक्षक बनले आहेत. महिला अत्याचारात भाजपचे नेते गुंतलेले आहेत. भाजपशी संबंधित नेते बदलापूरमधील शाळेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आहेत. भाजपकडून निवडणूक लढवलेली व्यक्ती सरकारी वकील म्हणून नियुक्त होत असेल तर संशय घ्यायला जागा आहे, असेही म्हणाल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur congress spokesperson ragini nayak criticizes rss chief mohan bhagwat and pm narendra modi for silence on women s issues rbt 74 psg