नागपूर : अंबाझरी तलावाचा सांडवा वाहून नेण्याऱ्या नाल्यावर पुलाच्या बाजूच्या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. परिणामी, रोज सायंकाळपासून ते रात्री १० वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीला वाहनचालक कंटाळले असून वाहतूक पोलीस मात्र रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून वसुलीत मग्न असल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबाझरी तलावातील सांडवा वाहून नेणाऱ्या रस्त्यावर पुलाचे बांधकाम करण्यासाठी जवळपास साडेचार महिने रस्ता बंद ठेवण्यात आला. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या पुलाखालील बांधकाम सुरू आहे. परंतु, हे काम संथगतीने सुरू आहे. आठ ते १० दिवसांच्या कामासाठी महिना उलटला तरी सुरूच आहे. पुलावरील एकेरी वाहतुकीमुळे अंबाझरी टी पॉईंट मार्गावरून स्वामी विवेकानंद चौकापर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी दोन्ही चौकात उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडीवर तोडगा निघताना दिसत नाही. अनेकदा वाहतूक पोलीस कर्मचारी स्वामी विवेकानंद चौक ते माटे चौकापर्यंतच्या रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून वसुली करण्यात मग्न असतात, अशी चर्चा आहे.

हेही वाचा…बलात्काराच्या आरोपीची सुटका…न्यायालय म्हणाले, शिक्षेसाठी वैद्यकीय पुरावा पुरेसा नाही…

u

आयटी पार्क मार्गावर पुन्हा अतिक्रमण

माटे चौक ते आयटी पार्कपर्यंतच्या रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पुन्हा ठाण मांडले आहे. ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर कारवाई झाली होती. मात्र, आता पुन्हा खाद्यपदार्थ्यांच्या वाहनांनी हा रस्ता सजला आहे. वाहतूक पोलीस, महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक या विक्रेत्यांकडून वसुलीसाठी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur construction of side road to ambazari lake bridge citizens facing one way traffic adk 83 sud 02