नागपूर : राज्यासह देशभरात करोनाचा प्रभाव ओसरला आहे. परंतु आजही करोनापश्चात काही रुग्णांमध्ये थकवा, अशक्तपणा, झोपेच्या समस्यांसह इतरही काही त्रास आढळत आहे, अशी माहिती महाराष्ट्रातील कोविड टास्क फोर्सचे माजी सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरातील हाॅटेल सेंटर पाॅईंट येथे शनिवारी अतिदक्षता विभाग तज्ज्ञाची आंतराष्ट्रीय परिषद होती. त्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. पंडित पुढे म्हणाले, भारतात करोनाची साथ गंभीर होती. परंतु सरकारचे झटपट नियोजन आणि समाजाच्या सामुहिक प्रयत्नातून करोनावर नियंत्रण मिळवले. आजही काही गंभीर करोना होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये थकवा, अशक्तपणा, झोपेच्या व्याधीसह इतरही त्रास आढळत आहे.

हे ही वाचा…दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दराने सर्व विक्रम मोडले; हे आहेत आजचे दर…

पूर्वी गंभीर साथीचे आजार झालेल्या रुग्णांमध्येही अनेक वर्षानंतर अशक्तपणा, थकवासह इतरही काही त्रास राहायचा. परंतु त्याकडे लक्ष दिले जात नव्हते. आता प्रत्येक रुग्णाच्या त्रासाला गांभिर्याने बघितले जाते. करोनानंतर आताच्या काळात अतिदक्षता विभाग, जिवनरक्षण प्रणालीसह इतरही अत्यवस्थ रुग्णांशी संबंधित गोष्टीला सर्वसामान्य नागरिकही ओळखायला लागले आहे. त्यामुळे आजार झालेला व्यक्त जास्त दिवस अंगावर त्रास काढत नाही. हे रुग्ण लगेच शासकीय वा खासगी डॉक्टरांकडे उपचाराला येतो. त्यामुळे रुग्णावर वेळीच उपचार होत असल्याने त्यामधील गुंतागुंत वाढत नाही. सरकार नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणे चांगली गोष्ट असून त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय यंत्रणा सक्षम होण्यास मदत होणार असल्याचेही डॉ. पंडित यांनी सांगितले.

करोनानंतरही रोगप्रतिकारक शक्ती चांगली

करोनामध्ये विविध औषधांतून रुग्णांवर स्टेराॅईडचा वापर झाला. परंतु ते बहुतांश रुग्णांवर हा वापर गरजेचाही होता. करोनापश्चात आता विविध उपचाराला येणाऱ्या रुग्णांवर उपार करताना आताही या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असून ते सर्वच औषधांना चांगला प्रतिसाद देत असल्याचा अनुभव येत असल्याचेही डॉ. पंडित म्हणाले.

हे ही वाचा…”राणा दाम्‍पत्‍यासाठी पती-पत्‍नी एकत्रिकरण योजना राबविणार”, भाजप नेत्याची टीका

‘इकमो’सह नवीन तंत्रज्ञान रुग्णांसाठी फायद्याचे

हल्ली एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (इकमो)सह इतरही नवीन तंत्रज्ञान रुग्णांसाठी फायद्याचे ठरत आहे. इकमो हा एक प्रकारचा कृत्रिम जीवन आधार आहे. तो रुग्णाचे फुफ्फुस आणि हृदय योग्यरित्या कार्य करत नसल्यास संबंधिताच्या शरीरातून सतत रक्त पंप करते आणि नंतर ऑक्सिजन जोडणाऱ्या आणि कार्बन डायऑक्साइड काढून टाकणाऱ्या उपकरणांद्वारे पाठवते. हृदयाला आणि फुफ्फुसांना विश्रांती देणे आणि श्वसन संक्रमण, हृदयविकाराचा झटका किंवा आघातातून बरे करण्यासाठी इकमो फायद्याचे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur corona virus effect faded but some patients still face fatigue and weakness issues mnb 82 sud 02