स्वतःवर दाखल असलेले फौजदारी गुन्हे निवडणूक प्रतिज्ञापत्रात न दाखविल्याप्रकरणी नागपूरमधील न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली असून, त्यांना किंवा त्यांच्या वकिलांना आठ आक्टोबर रोजी न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
नागपूरमधील अॅड. सतीश उके यांनी याप्रकरणी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन फौजदारी प्रकरणांचा समावेश केला नाही. या दोन प्रकरणाची माहिती फडणवीस यांनी हेतूपुरस्सर दडविली. त्यामुळे उमेदवाराविषयी जाणून घेण्याचा मतदाराचा हक्क डावलण्यात आला. त्याचबरोबर जिल्हा न्यायालयात प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा तपशील त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेला नाही. ही बाब त्यांनी याचिकेद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली
याचिकाकर्ते फडणवीस विजयी झालेल्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील मतदार आहेत. फडणवीस यांनी १९९७ आणि २००० मधील फौजदारी प्रकरणात जामीन घेतला आहे. मात्र, त्यांनी न्यायालयाने दखल घेतलेल्या प्रकरणांचा तपशील विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना दिलेला नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे न दाखवल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना नोटीस
आठ आक्टोबर रोजी न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत
Written by विश्वनाथ गरुड
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-09-2015 at 17:30 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur court notice to chief minister devendra fadnavis