नागपूर : ग्रामीण भागातील हॉटेलमध्ये देहव्यापार करण्यासाठी दार्जिलिंग शहरातील तरुणींना नागपुरातील दलाल आणत आहेत. त्यांचे आर्थिक शोषण करुन त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत आहेत. रामटेक परीसरातील हिवरा रोडवरील नेचर पॉईंट हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात दार्जिलिंगच्या तरुणीला देहव्यापार करताना ताब्यात घेतले. पोलिसांनी हॉटेलच्या व्यवस्थापकासह सहा आरोपींवर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेकमधील हिवरा रोडवर असलेल्या नेचर पॉईंट हॉटेल असून या हॉटेलमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून देहव्यापार सुरु आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये अनेक आंबटशौकीन ग्राहकांची गर्दी वाढली होती. अनेक ग्राहक रात्रीच्या सुमारास यायला लागले होते. त्यामुळे अनेकांना संशय आला. दिवसेंदिवस गर्दी वाढत चालल्यामुळे हॉटेलचा व्यवस्थापक शुभम ठाकूर (रामटेक) याने दार्जिलिंगमधील काही तरुणींना देहव्यापार करण्यासाठी आपल्या हॉटेलवर आणले. त्यामध्ये २१ वर्षीय तरुणी पदवीचे शिक्षण घेत होती. शिक्षणासाठी पैसा गोळा करण्यासाठी ती देहव्यापार करीत होती. आरोपी नरेंद्र चौधरी (बालाघाट), शुभम हारोडे (चिंचभवन, पारशिवनी), प्रेमचंद डडुरे (पारशिवनी), लोकेश रेवतकर (बोरबन) आणि आनंद सरवरे (चिचभवन) यांनी संगनमत करुन हॉटेलमध्ये तरुणींना बोलावून देहव्यापार करवून घेणे सुरु केले. हॉटेलमध्ये आलेल्या आंबटशौकीन ग्राहकांना तरुणींना पुरवत होते. लोकेश रेवतकर हा ग्राहकांसोबत तरुणींना पाठविण्यापूर्वी स्वत:ची प्रेयसी असल्याची ओळख करुन देत होता.

man got married with classmate yet keep immoral relationship with four young women
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमविवाह तरीही चार तरुणींशी अनैतिक संबंध; पत्नीने कंटाळून गाठले भरोसा सेल
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
minor girl sexualy abused by lover in nagpur
नागपूर : मध्यरात्री अल्पवयीन मुलगी प्रियकराच्या मिठीत; वडिलांनी…
Arvi, Dadarao Keche, Sumit Wankhede,
@ सिक्स पीएम, काय होणार आर्वीत ? राजकीय घडामोडींकडे लक्ष
man raped minor girl under railway bridge in nagpur
धक्कादायक! रेल्वे पुलाखाली अल्पवयीन मुलीवर करायचा लैंगिक अत्याचार…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
girl abducted and gang tortured Amravti news
अमरावतीत तरूणीचे अपहरण करून सामूहिक अत्‍याचार…
Sharad Pawar and Yugendra Pawar
Sharad Pawar : ५७ वर्षांचा राजकीय प्रवास, बारामती मतदारसंघ अन् पवार घराणं; युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची भावूक प्रतिक्रिया!

हेही वाचा – @ सिक्स पीएम, काय होणार आर्वीत ? राजकीय घडामोडींकडे लक्ष

पोलिसांचा हॉटेलमध्ये छापा

हॉटेलमध्ये देहव्यापार सुरु असल्याची माहिती पारशिवनीच्या सहायक पोलीस निरीक्षक धनश्री कुटेमाटे यांच्या नेतृत्वातील पथकाने हॉटेल नेचर पॉईंटवर बनावट ग्राहक पाठवला. त्याने तरुणीची मागणी केली. शुभम ठाकूर याने बनावट ग्राहकाकडून पैसे घेतले आणि दार्जिलिंगमधून आलेल्या तरुणीला त्याच्या रुममध्ये पाठवले. यादरम्याने, त्याने पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी लगेच छापा घातला. त्या तरुणीला देहव्यापार करताना ताब्यात घेतले. तर हॉटेलचा व्यवस्थापकासह सहा जणांवर रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले.

हेही वाचा – महाविकास आघाडीचा घोळ कायम, काँग्रेस इच्छुक असलेली हिंगणा विधानसभाही राष्ट्रवादीकडे

ढाब्यावर आणि लॉजवरही देहव्यापार

शहरालगत आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असलेल्या अनेक ढाब्यावर, हॉटेलवर आणि लॉजवर बिनधास्त देहव्यापार सुरु आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, काश्मीर, पंजाब येथील तरुणींना देहव्यापारासाठी नागपुरात आणले जात आहे. अनेक आंबटशौकिनांची गर्दी शहरालगत असलेल्या हॉटेलमध्ये वाढत आहेत. पोलिसांचे अशा देहव्यापाराच्या अड्ड्याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत आहे. अनेक हॉटेल-ढाब्यावर अनेक तरुणींकडून देहव्यापार करवून घेणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत.

Story img Loader