चंद्रपूर : शहरातील दुर्गापूर परिसरात भररस्त्यावर हत्येचा थरार अनुभवायला मिळाला. ७ ते ८ आरोपींनी धारदार शस्त्राने एका ३५ वर्षीय तरुणाचा शिरच्छेद केला. ही थरारक घटना सोमवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. महेश मेश्राम, असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुर्गापूर भागातील मेजर गेट परिसरात महेश मेश्राम याची हत्या करण्यात आली. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नागपूर : मित्राच्या प्रेयसीला धमकी देऊन मागितली एक लाख खंडणी

७ ते ८ जणांनी मिळून महेशचे शिर धडावेगळे केले. मृत महेशची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याने जुन्या वादातून त्याचा खून झाल्याचा कयास पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी २ संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे दुर्गापूर परिसरात तणाव आणि दहशतीचे वातावरण आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur crime news man brutally beheaded in chandrapur zws