Nagpur Crime : नागपूरमध्ये एका ४७ वर्षांच्या मानसोपचार तज्ज्ञाला पोलिसांनी अटक केली आहे. हा मानसोपचार तज्ज्ञ त्याच्या विद्यार्थिनींना, माजी विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करत होता तसंच त्याने अनेक विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. तीन माजी विद्यार्थिनींनी मानसोपचार तज्ज्ञाच्या विरोधात तक्रार नोंदवल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आपल्या पदाचा गैरवापर करुन या मानसोपचार तज्ज्ञाने अनेक विद्यार्थिनींचं शोषण केलं असावं असा संशय पोलिसांना आहे त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा तो पैलूही तपासून पाहात आहेत.

पोलिसांनी काय सांगितलं?

नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मानसोपचार तज्ज्ञाने त्याच्या तीन माजी विद्यार्थिनींना काही आक्षेपार्ह फोटो पाठवले, त्यानंतर तो या तिघींना ब्लॅकमेल करु लागला. यातील एका विद्यार्थिनीने पोलिसात जाण्याचं धाडस दाखवलं, ज्यानंतर इतर दोघीही पुढे आल्या आणि त्यांनीही तक्रार नोंदवली. ज्यामुळे पोलीस मानसोपचार तज्ज्ञाला अटक करु शकले.

pimpri chinchwad cyber crime loksatta news
सायबर क्राइम : महिन्याला दहा टक्के परतावा? उच्चशिक्षित तरुणाची ८० लाखांची अशी झाली फसवणूक…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Kerala Sexual Assual Case
Kerala Sexual Case : लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६४ पैकी २० जणांना अटक; ४० जणांचे नंबर वडिलांच्या मोबाईलमध्ये सेव्ह! चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
gang-rape_
Kerala Horror : पाच वर्षांत ६४ जणांकडून लैंगिक अत्याचार, केरळमध्ये क्रौर्याची परिसीमा; व्हिडिओही केले होते व्हायरल!
pune dance teacher sexually assaulted minors at school in Karvenagar
नृत्यशिक्षकाला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
pune Mobile filming was done in washroom of girls school
मुलींच्या शाळेतील प्रसाधनगृहात मोबाइल चित्रीकरणाचा प्रकार, शाळेतील शिपायाविरुद्ध गुन्हा शाळेचा शिपाई अटकेत
Shocking video of BAMS Student Attempts Bank robbery with Chilli Spray and air pistol in bhopal video viral on social media
विद्यार्थ्याचा प्रताप! मिरचीचा स्प्रे, एअर पिस्तूल अन्…, युट्यूब व्हिडीओ बघून घातला बॅंकेत दरोडा; VIDEO पाहून कपाळावर माराल हात
youth abused minor pune, gymnasium, Pune,
पुणे : व्यायामशाळेत अल्पवयीनावर अत्याचार करणाऱ्या तरुणाला २० वर्ष सक्तमजुरी

पोलीस उपायुक्तांनी काय सांगितलं?

या प्रकरणाबाबत पोलीस उपायुक्तांनी सांगितलं की आत्तापर्यंत आम्ही तीन जबाब नोंदवले आहेत. त्यांनी त्यांच्यावर कसा अन्याय झाला ते सांगितलं आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने या प्रकरणाच्या तपासासाठी आम्ही विशेष तपास पथक अर्थात SIT स्थापन केली आहे. आम्ही या प्रकरणातले सगळे पैलू तपासून पाहतो आहोत. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. पोलिसांनी हे देखील सांगितलं की सदर मानसोपचार तज्ज्ञाचं नागपूर शहरात क्लिनिक आहे. या क्लिनिकमध्ये हा मानसोपचार तज्ज्ञ त्याच्या विद्यार्थिनींना बोलवून घेत असे, समुपदेशन कसं केलं जातं हे सांगत असे, कधी त्यांचं समुपदेशन करत असे आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करत असे.

मानसोपचार शिबीरातही अत्याचार

गोंदिया आणि भंडारा येथील ग्रामीण भागातील शिबीरात सहभागी होण्यासाठी विद्यार्थिनी आणि पालकांना आमिष दाखवत असल्याचीही माहिती समोर आली आहे. पोलिसांनी हे देखील सांगितलं या शिबीरातही त्याने काही विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले अशीही माहिती समोर आली आहे. एका २७ वर्षीय विद्यार्थिनीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीत असंही सांगण्यात आलं की सदर मानसोपचार तज्ज्ञाचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. त्यात पोलिसांना अनेक महिलांचे अश्लील व्हिडीओ आणि छायाचित्रं सापडली आहे. या प्रकरणी मानसोपचार तज्ज्ञाच्या एका मित्रावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखीही काही मुली, माजी विद्यार्थिनी अडकलेल्या असू शकतात मात्र बदनामीच्या भीतीने त्या समोर आलेल्या नाहीत असा अंदाज आहे असंही पोलिसांनी सांगितलं.

Story img Loader