नागपूर : ‘आयरनमॅन’ ही जागतिक पातळीवर खेळाडूंच्या सहनशक्तीचा अंत पाहणारी स्पर्धा. या स्पर्धेत भल्याभल्यांना घाम फुटला आहे. मात्र, त्याचवेळी काही भारतीयांनी ‘आयरनमॅन’ हा खिताब देखील पटकावला आहे. दरम्यान, यावेळी ही स्पर्धा अधिक जास्त चर्चेत आहे. ऑस्ट्रेलिया येथे या स्पर्धेत महाराष्ट्राच्या उपराजधानीतील १८ वर्षीय दक्ष खंते याने ही स्पर्धा पूर्ण केली आहे. त्याने १४.१४:४० तासात ही स्पर्धा पूर्ण केली. विशेष म्हणजे त्याच्या वाढदिवशीच एक डिसेंबरला या स्पर्धेचे आयोजन हा एक योगायोग होता.

सहनशक्ती आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने ही अतिशय कठीण स्पर्धा आहे. साहसी उपक्रम राबवणाऱ्या सीएसी ऑलराउंडर या संस्थेचे संचालक अमोल खंते आणि योग प्रशिक्षक एकता खंते यांचा दक्ष हा मुलगा आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियातील बसेल्टनमध्ये आयोजित या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दक्ष खंते हा त्याच्या आईसोबत गेला होता. यावर्षी आयोजित स्पर्धेचे हे २०वे वर्ष होते. पश्चिम ऑस्ट्रेलिया येथे आयोजित या स्पर्धेत ५२ देशातील तीन हजार ५०० खेळाडू एकत्र आले होते. यात ७०.३ ॲथलीट श्रेणींमध्ये दोन हजार ६६० सहभागी होते. तर पूर्ण अंतराच्या ॲथलीटसाठी ८४० सहभागी होते.

Steve Smith Smashes 34th Test Century and 11th Hundred Against India Most By any Batter IND vs AUS
IND vs AUS: स्टिव्ह स्मिथचं ऐतिहासिक कसोटी शतक, भारताविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
IND vs AUS ICC BCCI and Indian Cricket Team in One Word Australian Cricket Answer Watch Video
VIDEO: ICC पेक्षा BCCI वरचढ? ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दिली भन्नाट उत्तरं, हेड-स्मिथच्या उत्तराने वेधलं लक्ष
chota dadiyal tiger latest news in marathi
Video : ताडोबातील ‘‘अजीम-ओ-शान शहंशाह” कोण..?

हेही वाचा – वन विभागाचा प्रताप! आंधळेपणाने केली शेकडो झाडांची कत्तल

दक्ष खंते याने पूर्ण अंतराच्या ‘आयरनमॅन’ स्पर्धेसाठी प्रयत्न केला. यात ३.८ किलोमीटर समुद्र पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किलोमीटर धावणे असे आव्हान त्याने पूर्ण केले. दक्ष खंते याने नुकतेच एक डिसेंबरला त्याच्या वयाची १८ वर्ष पूर्ण केली आणि पूर्ण अंतराच्या ‘आयरनमॅन’ स्पर्धेतील तो सर्वात तरुण सहभागी होता. आयआयटी जबलपूर येथे तो शिकत आहे. त्याला माईल्स अँड मिलर्सचे संचालक डॉ. अमित समर्थ, एंड्यू स्पोर्टसचे यश शर्मा आणि शशिकांत चांदे त्याचे प्रशिक्षक आहेत. ऑस्ट्रेलियात सराव करत असताना त्याची आई एकता खंते ज्या स्वत: एक योग प्रशिक्षक आहेत, यांनी त्याला मार्गदर्शन केले. दक्षचा सहभाग हा नागपूरकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे आणि त्याच्या समर्पण आणि चिकाटीचे ते प्रतिक आहे. सर्वात तरुण ॲथलीट म्हणून, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर तरुणांच्या भावनेचे आणि दृढनिश्चयाचे नेतृत्त्व केले. ही उल्लेखनीय कामगिरी दक्षला महत्त्वाकांक्षी क्रीडापटूंसाठी एक आदर्श म्हणून स्थान देते आणि भारतीय सहनशक्ती खेळांचे जागतिक स्तर उंचावते. त्याच्या वाढदिवशी स्पर्धेत सहभागी होणे ही त्याच्यासाठी पहिली वेळ नाही.

हेही वाचा – Video: Tiger vs Tiger… ताडोबात छोटी ताराच्या दोन बछड्यांमधे जुंपली

गेल्या वर्षी १७व्या वाढदिवसाला त्याने २१ किलोमीटरची हाफ मॅराथॉन पूर्ण केली. दक्षने ३.९ किलोमीटरची सागरी जलतरण शर्यत एक तास ३४ मिनिटे २८ सेकंदात पूर्ण केली. या कठीण सायकलिंग शर्यतीत त्याने १८० किलोमीटर हे अंतर सहा तास ४० मिनिटे आणि २६ सेकंदात पूर्ण केले. त्यानंतर त्याने ४२ किलोमीटरचे मॅरेथॉन पाच तास, ३६ मिनिटे आणि १६ सेकंदात पूर्ण केले.

Story img Loader