नागपूर: धनत्रयोदशीच्या एक दिवसापूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. परंतु एन् धनत्रयोदशीला मंगळवारी (२९ ऑक्टोंबर) नागपुरात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सोने- चांदीचे दागिने खरेदीचा बेत आखलेल्या ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान सोन्याच्या दरात वाढीनंतरही नागपुरातील बऱ्याच सराफा दुकानात ग्राहकांनी सकाळपासून ग्राहकांनी गर्दी केली आहे.

दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या मुहर्तावर ग्राहक मोठ्या संख्येने सोने- चांदीचे दागिने खरेदी करतात. परंतु हल्ली सोन्याच्या दर उंचीवर गेल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. धनत्रयोदशीच्या एक दिवसापूर्वी नागपुरातील सराफा बाजारात २८ ऑक्टोंबरला सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७८ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार रुपये नोंदवले गेले होते. त्यामुळे एक दिवसापूर्वीच्या तुलनेत हे दर किंचित कमी झाले होते. परंतु एन् धनत्रयोदशीला दर वाढले.

हेही वाचा…विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमकीचे गोंदिया ‘कनेक्शन’…

u

धनत्रयोदशीला मंगळवारी (२९ ऑक्टोंबर) बाजार उघडल्यावर सोन्याचे दर वाढले आहे. नागपुरातील २९ ऑक्टोंबरला सराफा बाजारात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे एन् धनत्रयोदशीला दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी गरजेच्या तुलनेत कमी वजनाचे सोने- चांदिचे दागिने खरेदी केले. तर काही सधन ग्राहकांनी दरवाढीनंतरही दागिन्यांची मनसोक्त खरेदी केल्याचेही सराफा व्यवसायिकांचे म्हणने आहे. दिवाळीसोबतच ग्राहक लग्न समारंभ, बारसे आणि इतरही अनेक कार्यक्रमात भेट म्हणून सोने- चांदीचेही दागिने देतात. दरम्यान आता दर जास्त असले तरी पुढे ते आणखी वाढण्याचा अंदाज सराफा व्यवसायिक वर्तवत आहे.

हेही वाचा…Video : ताडोबातील वाघ म्हणतो, ‘बस आता..! मला तुमचा कंटाळा आलाय’

चांदीच्या दरातही मोठी वाढ…

धनत्रयोदशीच्या एक दिवसापूर्वी नागपुरातील सराफा बाजारात २८ ऑक्टोंबरला सकाळी ११ वाजता चांदीचे दर प्रति किलो ९६ हजार ८०० रुपये होते. धनत्रयोदशीच्या दिवशी २४ तासातच चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २९ ऑक्टोंबरला चांदीचे दर प्रति किलो ९८ हजार ८०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल २ हजार रुपयांची वाढ झाली. दरम्यान धनत्रयोदशीला ग्राहक मोठ्या संख्येने चांदीची विविध देवी- देवतांची नाणी खरेदी करतात. त्यामुळे दरवाढीचा त्यावर परिणाम होणार काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader