लोकसत्ता टीम

नागपूर : काँग्रेसचे नागपूर जिल्ह्यातील दिग्गज नेते तथा माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविले आहे. न्यायालयाने सुनील केदार यांना ५ वर्षाचा कठोर कारावास आणि १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

आणखी वाचा-दोघेही विवाहित; अडकले प्रेमाच्या जाळ्यात, पतीला कुणकुण लागताच…

सुनील केदार हे या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. २००१-०२ दरम्यान हा घोटाळा झाला तेव्हा केदार बँकेच्या अध्यक्षस्थानी होते. मुंबई, कोलकाता आणि अहमदाबाद येथील काही कंपन्यांनी बँकेच्या रकमेतून १२५ कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी केले होते. त्यानंतर या कंपन्यांनी सरकारी रोखे दिले नाही तसेच बँकेची रक्कमही परत केली नाही.दोषी ठरवलेल्या आरोपींमध्ये सुनील केदार,अशोक चौधरी, केतन शेठ, अमित वर्मा, सुबोध भंडारी, नंदकिशोर त्रिवेदी यांचा समावेश आहे. इतर दोन आरोपींपैकी रोखे दलाल संजय हरिराम अग्रवाल यांच्याविरुद्धच्या खटल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे तर कानन वसंत मेवावाला फरार आहे.

Story img Loader