लोकसत्ता टीम

नागपूर : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला तीन सुवर्णपदके मिळवून देणाऱ्या नागपूरकर ओजस देवतळेचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. नागपूरचे पालकमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच ओजसच्या आई-वडिलांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व ओजसच्या कामगिरीचे कौतुक केले होते. तिसरे सुवर्णपदक मिळवल्यानंतर प्रशासनाच्यावतीने रविवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांचे स्वागत केले.

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
loksatta readers feedback
पडसाद : मनात डोकावून पाहायला लावणारे भाषण
old womans dead body found in Mutha river police investigation underway
पुणे : मुठा नदी पात्रात ज्येष्ठ महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू
Sanskruti More, a visually challenged chess player, satara district
अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरे
swiggy employee stock option scheme
स्विगीचे ५०० कर्मचारी कोट्याधीश
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त

ओजस देवतळेने शनिवारी तिरंदाजीत कंपाउंड गटात वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवले. तत्पूर्वी मिश्र आणि सांघिक प्रकारतही त्याने सुवर्णपदक पटकावले होते. डॉ. इटनकर यांनी तेजसच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडीलांचे अभिनंदन केले. ओजसने नागपूरच्या मुलांना दिशा दाखवली असून नागपूरच्या क्रीडा जगताला यामुळे उभारी येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आणखी वाचा-पाच लाखांची नुकसान भरपाई द्या, नागपूरच्या पूरग्रस्तांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

यावेळी ओजसचे वडील प्रवीण देवतळे, आई अर्चना, काकू राधिका, काका विनय व मोहन देवतळे, लहान भाऊ यथार्थ व व्योम आदी उपस्थित होते. क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, उपविभागीय अधिकारी हरिश भामरे यावेळी उपस्थित होते.

“आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला तीन सुवर्णपदके मिळवून देत नागपूरचे नाव जगात उंचावणाऱ्या ओजस देवतळेची कामगिरी सर्व नागपूरकरांसाठी अभिमानास्पद आहे. क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी ओजस निश्चितच प्रेरणादायी ठरेल” -डॉ.विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नागपूर</strong>