नागपूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. नागपूर विभागाचा निकाल ९७ टक्के लागला. यामध्ये नागपूर जिल्हा ९७.९३ टक्क्यांसह विभागात पहिला आला तर सर्वात कमी निकाल (९५.६२टक्के) गडचिरोली जिल्ह्याचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच निकालात यशाचा ठसा उमटवला असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ९७.८९ टक्के आहे़ बारावीच्या परीक्षेत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेला नागपूर विभाग दहावीमध्ये चौथा क्रमांकावर आहे.

नागपूर विभागीय शिक्षण मंडळाअंतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो़ विभागीय मंडळामार्फत मार्च २०२२ मध्ये दहावीची परीक्षा १५ मार्च ते ९ एप्रिल दरम्यान घेण्यात आली़ या परीक्षेकरिता विभागातून १ लाख ५५ हजार ३६० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यातील १ लाख ५३ हजार ७३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १ लाख ४९ हजार १३३ उत्तीर्ण झाले़त.

यंदा ३ हजार ६४१ परीक्षार्थींनी (गतवेळी नापास झालेल्या ) फेरपरीक्षा दिली़ त्यातील २ हजार ७ विद्याार्थी उत्तीर्ण झाले़ निकालाची टक्केवारी ८२.०१ टक्के आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेतही यंदा नागपूर विभागाचा निकाला टक्का उंचावल्याची प्रतिक्रिया मंडळाचे विभागीय अध्यक्ष चिंतामन वंजारी यांनी दिली.

नागपूर विभागाचा जिल्हानिहाय निकाल
जिल्हा प्रविष्टविद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी
भंडारा १६७६८ १६३०९ ९७.२६
चंद्रपूर २८५६५ २७४१५ ९५.९७
नागपूर ५९३२४ ५८१०१ ९७.९३
वर्धा १६०१३ १५४१२ ९६.२४
गडचिरोली १४१२७ १३५०९ ९५.६२
गोंदिया १८९४२ १८३८७ ९७.०७