नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाकांक्षी अभियान असलेल्या जलयुक्त शिवारमध्ये नागपूर जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. पावसाची अनियमितता व खंड याचा कृषी क्षेत्रावर वाईट परिणाम होतो. राज्यातील सिंचनाच्या मर्यादित सुविधा, अवर्षणप्रवण क्षेत्राची व्याप्ती, हलक्या जमिनी आणि कमी पाऊस या बाबी विचारात घेऊन जलयुक्त शिवार टप्पा- २ ची सुरुवात करण्यात आली.
हेही वाचा – नागपूर : गडकरींच्या मागणीनंतर रेल्वे मंत्रालयाचा निर्णय, तीन विशेष गाड्या सोडणार
यासाठी नागपूर जिल्ह्यातील २४३ गावांची निवड करण्यात आली. या सर्व गावांमध्ये एकूण ३ हजार ८९१ कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे नागपूर जिल्हा या कामात आघाडीवर आहे. प्रगतिपथावरील कामांमध्ये भंडारा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर, सांगली तिसऱ्या, औरंगाबाद चौथ्या तर यवतमाळ पाचव्या स्थानावर आहे. पालकमंत्री फडणवीस यांनी उपविभागीय स्तरावर या कामांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पाहणी दौरा केला. त्यामुळे या अभियानाला गती मिळाली आहे.