नागपूर : कर्मचारी संघटना व शासन यांच्यात पदोन्नतीच्या मुद्यावरून अनेकदा संघर्ष होतो. परंतु शासन पदोन्नतीसाठी तयार असताना त्यासाठी पात्र कर्मचारीच न मिळणे अशी वेळ अपवादात्मक प्रसंगी येते. भूमिअभिलेख विभागाने एकाच वेळी राज्यातील ७५ कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली. फक्त नागपूर विभागात अटी, शर्तीची पूर्तता करणारे कर्मचारीच उपलब्ध सधी नसल्याने एकही कर्मचारी पदोन्नत होऊ शकला नाही. भूमिअभिलेख खात्यातने राज्यभरातील एकूण ७६ कर्मचाऱ्यांना अलीकडेच पदोन्नत केले. पदोन्नतीसाठी अर्हता परीक्षा उत्तीर्ण करणे व एका गट समूहात तीन वर्षांपेक्षा अधिक सेवा पूर्ण करणे हे निकष पूर्ण करावे लागतात. या आधारावरच विभागाने ५ ऑगस्ट २०२२रोजी राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती विभागातील ७६ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढले. यात अमरावती विभागातील १५ कर्मचारी, नाशिक विभागातील १६, पुणे विभागातील १८ कर्मचारी, औरंगाबाद विभागातील ९ आणि मुंबई विभागाताल १८ अशा एकूण ७६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पण यात नागपूर विभागाचा समावेश नाही. कारण या विभागात पद समूह तीनमध्ये तीन वर्षे सेवा पूर्ण करणारे तसेच अर्हता परीक्षा उत्तीर्ण करणारे कर्मचारी उपलब्ध नव्हते. मे २०२२ मध्ये अर्हता परीक्षा झाली. पण परीक्षेचा निकाल लागण्यास विलंब झाला. त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसला. परीक्षेचा निकाल तातडीने लावावा, अशी मागणी कर्मचारी संघटनेने जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांचे कडे केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा