नागपूर : Maharashtra mlc election result 2023 नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीच्या मतमोजनीला आज सकाळी ८ वाजता नागपूर शहरातील अजनी रेल्वेचे समुदाय भवन येथे सुरुवात झाली. सुरूवातीलाच महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार नागोराव गाणार याचा पराभव केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> MLC Election Result Today 2023 : अमरावती पदवीधर मतदार संघात मतमोजणी सुरू, निकालाची उत्‍कंठा

पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४०७१ तर गाणार यांना ६३०९ मते मिळाली. एकूण ७ हजाराहून अधिक मतांनी अडबाले आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. दहा वर्षापासून भाजपाकडे असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली भाजपाने गाणार यांची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, फडणवीस, गडकरी यांनी त्यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. दरम्यान, पहिल्या फेरीत अडबाले यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur division teacher constituency bjp mavia adbale leads by 7 thousand dag 87 ysh