नागपूर : नागपुरात ३१ पेक्षा जास्त उड्डाणपुलांची संख्या झाली आहे. काही ठिकाणी उड्डाणपुलावरील वाहतूक सुरळीत झाली. परंतु, पुलाखालील चौकात वाहतुकीची कोंडी ‘जैसे थे’ आहे. सक्करदरा चौक हे वाहतूक कोंडीचे सर्वात मोठे उदाहरण आहे. या चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी असून त्यावर वाहतूक पोलिसांना अद्यापपर्यंत तोडगा काढता आला नाही. सक्करदरा पुलामुळे उमरेड, ताजबाग, भांडे प्लॉट, नंदनवन सक्करदरा तलाव परिसर आणि देवी मंदिर चौकापर्यंत जाण्यासाठी सुलभता झाली आहे.

जैनकलार समाज भवन चौकापासून ते भांडे प्लॉट चौकापर्यंत सक्करदरा उड्डाणपूल आहे. अशोक चौकातून थेट सक्करदरा चौकापलीकडे जाणाऱ्या वाहनासाठी हा पूल बांधण्यात आला. मात्र, मोजकी जडवाहने सोडली तर पुलाखालूनच वाहतुकीची वर्दळ अधिक असते. त्यामुळे या उड्डाणपुलाचा वाहतूक कोंडी कमी करण्याचा उद्देश सफल झालेला नाही असे सध्याचे चित्र आहे.

nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र

हेही वाचा – विदर्भात स्फोट बळी वाढताहेत, पण ‘बर्न वॉशिंग युनिट’ नाही!

आताही ट्रॅव्हल्स, मालवाहू वाहने आणि टिप्परसारखी वाहनेसुद्धा पुलाखालून धावतात. उमेरडला जाणारी वाहनेही पुलावरून जात नाहीत. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीची कोंडी कायम आहे. सक्करदरा चौकात आणि महालकडे जाणाऱ्या रस्त्यावर कपड्याची मोठमोठी दुकाने आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी असते. तसेच सक्करदरा चौक परिसरात ५ ते ६ नामांकित महाविद्यालये आहेत. तेथील विद्यार्थ्यांचीही गर्दी या चौकातच असते. बाजारपेठ आणि महाल-मोठा ताजबागकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने सक्करदरा चौकाला महत्त्व आले आहे.

या चौकात ऑटोचालकांची मोठी गर्दी असते. त्यांना थांबा अद्याप दिल्या गेला नाही. त्यामुळे ऑटोचालक रस्त्यावरच ऑटो लावतात. त्यामुळेसुद्धा रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. चौकातून सिग्नलचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. विद्यार्थीवर्ग दुचाकीने जाताना सिग्नलकडे लक्ष देत नाहीत. वाहतूक पोलीस कर्मचारी किमान रात्री ९ वाजेपर्यंत चौकात राहायला हवा. अन्यथा या चौकातून वाहतूक सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे.

हातठेल्यांनी घातला चौकाला विळखा

सक्करदरा चौकात हातठेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे चौकाला हातठेल्यांचा विळखा असल्याचे चित्र आहे. चौकातून चारही बाजूला जाणाऱ्या रस्त्यावर हातठेले लागलेले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अवरोध होतो. हातठेल्यावरील ग्राहकांची वाहनेसुद्धा रस्त्यावरच उभी केली जातात. हातठेले आता चक्क पदपथाच्याही समोर आले असून याकडे महापालिका आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष आहे.

हेही वाचा – नागपूर: आशिया खंडातील सर्वात मोठ्या कृषीमाल बाजारात कष्टकऱ्यांची वास्तू ! काय आहे इतिहास ?

सक्करदरा चौकातून जाताना नेहमी किरकोळ विक्रेत्यांची गर्दी आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सायंकाळपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर वाहनांची कोंडी निर्माण होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या वाहतुकीच्या कोंडीवर तोडगा काढावा. – मेघा काळे (गृहिणी)

सक्करदरा चौकातून उमरेडकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. तसेच बाहेरून येणारी वाहनेसुद्धा सक्करदरा चौकातूनच जातात. त्यामुळे होत असलेल्या वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. चौकात कायमस्वरूपी तीन पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी तैनात असतात. – भारत कऱ्हाडे, पोलीस निरीक्षक, सक्करदरा वाहतूक शाखा