नागपूर : नागपूरमध्ये २१ आणि २२ मार्च दरम्यान जी-२० देशांच्या प्रतिनिधी मंडळाची बैठक होत असून यानिमित्ताने नागपूरचे ‘ टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ असे ब्रॅण्डिंग केले जात आहे. वास्तविक नागपूरची ओळख ही या परिसरात उत्पादित होत असलेल्या व चवीमुळे देशविदेशात प्रसिद्ध पावलेल्या संत्र्यामुळे संत्रानगरी अशी आहे. त्यामुळे सरकारने जी-२० च्या निमित्ताने नागपूरचे ब्रॅण्डिंग करताना ‘टायगर कॅपिटल’सोबत संत्रानगरी असेही करावे, अशी मागणी संत्री उत्पादकांच्या माध्यमातून केली जाऊ लागली आहे.
हेही वाचा >>> सूरजागड लोह खाणीतील वाढीव उत्खननाला अनेक अटींसह पर्यावरण विभागाची परवानगी
नागपूरमध्ये जी-२० संमेलनाची तयारी जोरात सुरु आहे. ज्या भागात ही बैठक होणार आहे. त्या भागाचे सौंदर्यीकरणाचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. यामध्ये शहराचे रस्ते, भिंती, इमारतीचे रंगरंगोटी केली जात आहे. नागपूर हे जागतिक दर्जाचे सुंदर शहर असल्याचे प्रशासनाला संमेलनासाठी येणाऱ्या पाहुण्यांना दाखवायचे आहे. मात्र नागपूर शहराची ओळख म्हणून काय दाखवायचे याचा मात्र पेच निर्माण झाला आहे. कारण जी-२० बैठकीच्या माध्यमातून आयोजकांनी नागपूरला ‘टायगर कॅपिटल ’म्हणून प्रमोट करण्यास प्रशासनाने सुरूवात केलीआहे. त्यावर नागपूरचे संत्री त्पादक शेतकरी नाराज आहे. नागपूर पूर्वापार संत्रानगरी म्हणूनच प्रसिद्ध आहे.
हेही वाचा >>> मेट्रोप्रमाणे रेल्वेही उन्नत मार्गाचा पर्याय शोधतेय! इतवारी-नागभीड, वडसा-गडचिरोली उन्नत रेल्वेमार्ग
त्यामुळे या नावानेच ब्रॅण्डिंग व्हावे, अशी मागणी महारेंज या संत्राउत्पादक शेतकऱ्यांच्या संस्थेने केली आहे. ‘आम्ही टायगर कॅपिटल सोबत नागपूरची ऑरेंज सिटी म्हणून ब्रॅण्डिंग करीत आहोत ” असे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे.खरंतर देशात नागपूरची ओळख ही संत्रानगरी म्हणूनच आहे. मात्र जी -२० संमेलन हे जागतिक स्तरावरचे संमेलन आहे. त्यामुळे कदाचित आयोजकांनी टायगर कॅपिटलला अधिक प्राधान्य दिले असावे. मात्र नागपूरला टायगर कॅपिटल हा दर्जा कधी व का मिळाला? विदर्भ आणि मध्यप्रदेशचा सीमावर्ती भाग पकडला तर नऊ व्याघ्र प्रकल्प हे नागपूरपासून काही तासाच्या अंतरावर आहे. देशातील ८० टक्के वाघ याच भागात आढळतात. नागपूरच्या संत्र्याचा इतिहास हा रघुजी राजे भोसले यांच्या काळापासूनचा आहे. नागपूरची संत्री ही तिच्या आंबट गोड चवीने जगभरात प्रसिद्ध आहे. जी-२० च्या माध्यमातून संत्र्याचे ब्रॅण्डिग केले तर संत्री जागतिक स्तरावरत जाईल.ही गमावू नका, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे.