नागपूर : ब्रिटीश राजवटीत लोक अत्याचाराने त्रस्त होते. त्यावेळी देश स्वातंत्र्य व्हावा या भावनेतून पिवळी मारबत सुरू केली तर इंग्रज शासनात बाकाबाई भोसले ही इंग्रजांना जाऊन मिळाली, त्यामुळे येथे बांकाबाईचे प्रतिकात्मक स्वरूप म्हणून १९८१ पासून नेहरू पुतळा चौकात काळी मारबत तयार केली जाते. या काळ्या मारबतीला १४३ वर्षांचा इतिहास आहे.
तान्हा पोळ्याच्या दिवशी या काळ्या मारबतीची मिरवणूक काढली जाते. नेहरू पुतळा येथील श्री देवस्थान पंच कमेटीच्यावतीने ही काळी मारबत तयार केली जाते. या मंडळाचे अध्यक्ष निखिल हरडे यांनी सांगितले, मारबतीची ही परंपरा मूळ आदिवासींची आहे मात्र आमच्या पूर्वर्जांनी नागपुरात १८८१ पासून सुरू केली आहे. महाभारतातील पुतना मावशी मारबतीला संबोधले जाते. समाजातील वाईट प्रथा आपल्या बरोबर घेऊन जागे मारबत, अशा घोषणाच्या आवाजात मिरवणूक काढत या काळ्या मारबतीचे दहन केले जाते. १९४२ साली मारबत काढण्यात आली होती त्यावेळी असमाजिक तत्वानी गोंधळ घातला होता आणि लाठीहल्ला झाला होता, त्यात चेंगराचेंगरीत पाच लोक दगावले होते. त्यानंतरही काळ्या मारबतीची मिरवणूक काढण्यात आली होती.
इतवारी भागात नेहरू पुतळा चौकात ही काळी मारबत तयार करण्यासाठी एक महिना आधी सुरुवात केली जाते आणि पोळ्याच्या पाच दिवस आधी ती दर्शनासाठी ठेवली जाते. महिला वर्ग या मारबतीची खण नारळाने ओटी भरतात. बाकाबाईच्या नवऱ्याने तिच्या कृत्याचा विरोध केला नाही त्यामुळे त्याचा बडग्या तयार केला जात असून त्याची मिरवणूक काढली जाते, असा या मारबतीचा इतिहास असल्याचे हरडे यांनी सांगितल. अशी ही अनोखी प्रथा केवळ नागपूर येथेच बघायला मिळते. समाजातील वाईट प्रथा आपल्याबरोबर घेऊन जाय गे मारबत अशा घोषणांच्या आवाजात तिचे व बडग्याचे दहन केले जाते.